मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazing! अवघ्या 12 व्या वर्षी या पठ्ठ्याने कमावले 3 कोटी रुपये, जाणून घ्या काय केलं काम?

Amazing! अवघ्या 12 व्या वर्षी या पठ्ठ्याने कमावले 3 कोटी रुपये, जाणून घ्या काय केलं काम?

ही गोष्ट आहे एका तांत्रिक आविष्काराची आणि त्या आविष्कारामुळे करोडपती बनलेल्या 12 वर्षांच्या मुलाची. मुळच्या पाकिस्तानातल्या (Boy from Pakistan received 3 crore rupees) असलेल्या आणि सध्या लंडनमध्ये (London) असलेल्या बेनयामीन अहमदने

ही गोष्ट आहे एका तांत्रिक आविष्काराची आणि त्या आविष्कारामुळे करोडपती बनलेल्या 12 वर्षांच्या मुलाची. मुळच्या पाकिस्तानातल्या (Boy from Pakistan received 3 crore rupees) असलेल्या आणि सध्या लंडनमध्ये (London) असलेल्या बेनयामीन अहमदने

ही गोष्ट आहे एका तांत्रिक आविष्काराची आणि त्या आविष्कारामुळे करोडपती बनलेल्या 12 वर्षांच्या मुलाची. मुळच्या पाकिस्तानातल्या (Boy from Pakistan received 3 crore rupees) असलेल्या आणि सध्या लंडनमध्ये (London) असलेल्या बेनयामीन अहमदने

पुढे वाचा ...

लंडन, 25 सप्टेंबर: सध्याचं युग तंत्रज्ञानाचं (Technology) आहे आणि सध्याची पिढी त्या युगातली असल्याने साहजिकच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ती वेगवेगळे आविष्कार नि चमत्कार घडवते. ही गोष्ट आहे अशाच एका तांत्रिक आविष्काराची आणि त्या आविष्कारामुळे करोडपती बनलेल्या 12 वर्षांच्या मुलाची. मुळच्या पाकिस्तानातल्या (Boy from Pakistan received 3 crore rupees) असलेल्या आणि सध्या लंडनमध्ये (London) असलेल्या बेनयामीन अहमदने (Benyamin Ahmed) विकसित केलेल्या नॉन फंजिबल टोकनला (Non Fungible Token - NFT) तब्बल चार लाख डॉलर अर्थात सुमारे तीन कोटी रुपये एवढी किंमत मिळाली आहे. आहे की नाही कमाल!

या मुलाबद्दल जाणून घेण्याआधी नॉन फंजिबल टोकन NFT बद्दल थोडं जाणून घेऊ या. सध्या इंटरनेटवर उपलब्ध असलेला व्हिडीओ, म्युझिक किंवा फोटो इंटरनेटवर असलेलं कोणीही वापरू शकतं; मात्र जेव्हा या गोष्टी NFT स्वरूपात सादर केल्या जातात, तेव्हा मात्र त्यांच्या वापरावर मर्यादा येतात. कारण टोकन करून एका डिजिटल सर्टिफिकेटमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. त्यानंतर ते ब्लॉकचेनवर स्टोअर करून ठेवलं जातं. त्या NFT चा मालकच ते डिजिटल सर्टिफिकेट कोणालाही विकू शकतो. एकदा विकल्यानंतर ते पुन्हा पुढे विकलं गेलं, तरी मूळ मालकाला त्यातला काही टक्के हिस्सा मिळत राहतो. म्हणजेच साधारणतः पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी काही भाग लेखकाला रॉयल्टीच्या स्वरूपात मिळत राहतो. तसंच हे आहे. त्यामुळे NFTच्या विक्रीतून त्याच्या मूळ मालकाला कायम पैसे मिळत राहतात. ही क्रिप्टोकरन्सीमधली एक संज्ञा आहे.

Gmail चे हे फीचर्स माहितीयेत का? विना इंटरनेटही पाठवता येतील Mails, पाहा प्रोसेस

आता 12 वर्षांच्या बेनयामीनने नेमकं काय केलं हे जाणून घेऊ या. त्याचे वडील एक सॉफ्टवेअर डेव्हलपर असून, सध्या ते लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये कार्यरत आहेत. लहानपणापासून बेनयामीनला लॅपटॉपमध्ये खूपच रस होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला लॅपटॉप खरेदी करून दिला. त्यानंतर त्याने वयाच्या सहाव्या वर्षीच कोडिंग शिकायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो इतका बुद्धिमान आहे, की एवढ्या लहान वयातही कोडिंग शिकताना त्याला काहीही अडचणी आल्या नाहीत. त्यानंतर त्याने 'मिनिक्राफ्ट यी हा' नावाचा पहिला प्रोजेक्ट तयार केला. त्यातून तो जे काही शिकला, ते ज्ञान वापरून त्याने वीयर्ड व्हेल्स नावाचा दुसरा प्रोजेक्ट विकसित केला.

वीयर्ड व्हेल्स (Weird Whales) हा NFT प्रोजेक्ट त्याने बिटकॉइन व्हेलपासून (Bitcoin Whale) प्रेरणा घेऊन विकसित केला. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बिटकॉइन्स उपलब्ध असतात, त्यांना बिटकॉइन व्हेल म्हणतात. एका ओपन सोर्स पायथॉन स्क्रिप्टच्या (Open Source Python Script) साह्याने बेनयामीनने 3350 युनिक डिजिटल कलेक्टिबल व्हेल तयार केले. त्यामुळे बेनयामीनचं नशीब फळफळलं. त्याच्या या प्रोजेक्टला अवघ्या नऊ तासांत 1,50,000 डॉलर एवढी किंमत मिळाली आणि तो विकला गेला. हे नॉन फंजिबल टोकन तयार करण्यासाठी त्याला केवळ 300 डॉलर्स एवढा खर्च आला होता.

Google ची तुमच्या प्रत्येक Search वर नजर, असं ठेवता येईल सुरक्षित

वर उल्लेख केल्यानुसार, या NFTच्या सेकंडरी सेल्सच्या माध्यमातूनही बेनयामीनला पैसे मिळत गेले. आतापर्यंत त्याला तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम या प्रोजेक्टमधून मिळाली आहे. यातून मिळालेले पैसे त्याने कुठल्या बँकेत ठेवलेले नाहीत, तर त्याने ते क्रिप्टोकरन्सीत (Cryptocurrency) ठेवले आहेत. तो म्हणतो, की क्रिप्टोकरन्सी हे भविष्य आहे. क्रिप्टोकरन्सीच्या क्रांतीत भारतही मोठी भूमिका निभावू शकतो, असंही त्याने म्हटलं आहे.

'केवळ एक ओळख बनवून मला राहायचं नाही. मला आयुष्यात असं काही करायचं आहे, की 'पाहा तो वीयर्ड व्हेल्सवाला मुलगा आला!' असं मला पाहिल्यावर सगळे जण म्हणतील,' असं बेनयामीन सांगतो. छोट्या वयात त्याच्या विचारांची झेप खूप मोठी आहे, याची चुणूकच यातून दिसते.

First published:

Tags: Money