Home /News /mumbai /

यूट्यूबवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची होणार ऑनलाइन विक्री, 14 वर्षांपूर्वी झाला होता लोकप्रिय

यूट्यूबवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची होणार ऑनलाइन विक्री, 14 वर्षांपूर्वी झाला होता लोकप्रिय

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबवरील (You Tube) चौदा वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत गाजलेल्या व्हिडिओचा लिलाव करण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्यांनी घेतला आहे. ‘चार्ली बिट माय फिंगर’ नावाचा हा यूट्यूबवर सर्वाधिक व्हायरल झालेला एक व्हिडिओ असून एनएफटी म्हणजेच नॉन-फंजिबल टोकन (NFT) म्हणून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 मे: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबवरील (You Tube) चौदा वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत गाजलेल्या व्हिडिओचा लिलाव करण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्यांनी घेतला आहे. ‘चार्ली बिट माय फिंगर’ नावाचा हा यूट्यूबवर सर्वाधिक व्हायरल झालेला एक व्हिडिओ असून एनएफटी म्हणजेच नॉन-फंजिबल टोकन (NFT) म्हणून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. एकदा लिलाव झाल्यानंतर हा व्हिडिओ यूट्यूबवरून हटवला जाणार आहे. 14 वर्षांपूर्वी डेव्हिस-कॅर कुटुंबातील हॅरीआणि त्याचा छोटा भाऊ चार्ली यांचा हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. एक बाळ आपल्या मोठ्या भावाच्या मांडीवर बसलं असून ते आपल्या मोठ्या भावाचं बोट चावत आहे, असं दृश्य असलेला हा व्हिडिओ आहे. बाळानं बोट चावल्यावर मजा वाटलेला मोठा भाऊ हसत, चार्ली बीट माय फिंगर (Charlie Beat My Finger) असं सांगत आहे, तर ते बाळ पुन्हा त्याचं बोट आणखी जोरानं चावत आहे. दोन लहान मुलांमधील निरागस मस्ती दाखवणारा हा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय झाला होता. या व्हिडिओला जवळपास 88 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 23 मे रोजी या व्हिडिओला 14 वर्षे पूर्ण होत असून, नॉन-फंजिबल टोकन (NFT) म्हणून त्याचा लिलाव केला जाणार आहे. ओरिजिन प्रोटोकॉल (Origin Protocol) हा एनएफटी विक्रीसाठी असलेला प्लॅटफॉर्म याचा लिलाव आयोजित करणार आहे. हा लिलाव जिंकणारा विजेता हॅरी आणि चार्लीसह या व्हिडिओचं विडंबन देखील शूट करू शकेल. लिलावासाठीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हा व्हिडिओ गेल्या 14 वर्षांपासून डेव्हिस-कॅर कुटुंबाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि आता ते त्यांच्या या लहानपणीच्या आठवणीचा भाग होण्यासाठी इतरांचं स्वागत करण्यास उत्सुक आहेत. एनएफटी अर्थात नॉन-फंजिबल टोकन (NFT) हा या वर्षीचा सगळ्यात जास्त चालणारा ट्रेंड (Trend) आहे. अनेक डिजिटल कलाकृती, मीम, कलेक्टेबल आणि जीआयएफ नॉन-फंजिबल टोकन म्हणून महागड्या किंमतीला विकत घेतल्या जातात. अलीकडेच स्ट्रीटवेअर फॅशन लेबलची एक्सप्लेटिव्ह लाडेन लोगो असलेली व्हर्च्युअल ब्लॅक हूडी तब्बल 19 हजार डॉलर्स इतक्या प्रचंड किमतीला विकली गेली. तर गेल्या महिन्यात, ‘डिझास्टरगर्ल ’(Disaster Girl) म्हणून प्रसिद्ध झालेल्या झो रॉथनं आपल्या व्हायरल झालेल्या मीमच्या मूळफोटोची विक्री करून तब्बल अर्धा दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. एनएफटीही अनेक कलाकारांच्या डिजिटल स्वाक्षर्‍या असलेल्या डिजिटल कलाकृतींचे स्थान आहे. या कलाकृतींची मालकी आणि सत्यता पारखून हा डिजिटल कंटेंट प्रत्यक्षात फिजिकल आर्ट म्हणून विक्री करण्याची परवानगी दिली जाते. त्याची विक्री करून मालक पैसे कमवू शकतो आणि एनएफटीकडे त्याचा कॉपीराइट अबाधित राहतो. आगामी काळात जेव्हा जेव्हा ‘डिझास्टरगर्ल’ मीमच्या फोटोची विक्री होईल, तेव्हा झो रॉथला विक्रीच्या 10टक्के रक्कम मिळेल. एनएफटी अर्थात नॉन-फंजिबल टोकन म्हणून पहिला ऑस्कर नामंकन मिळणारा चित्रपट,जॅक डोर्सीचं पहिलं ट्विट,पहिला एनएफटी अल्बम अशा अनेक गोष्टींचा समावेश होऊ शकतो. आर्ट हाउसेस आणि लिलाव संस्थांसह अनेक वृत्त संस्था आणि आर्ट गॅलरीज देखील या ट्रेंड मध्ये सहभागी झाल्या आहेत. क्वार्ट्जनं(Quartz) एक लेख एनएफटीमध्ये रूपांतरित केला आहे, अर्थात ते पहिले नाहीत. असोसिएटेड प्रेसने (Associated Press) 11मार्च रोजी एक आर्टवर्क नॉन-फंजिबल टोकन म्हणून लिलावात काढले आणि केवळ आठ दिवसात त्याची प्रचंड मोठ्या किंमतीत विक्री झाली.आता कदाचित टिकटॉक (TikTok) व्हिडिओदेखील एनएफटी म्हणून विकले जाईल.प्रसिद्ध व्हिडिओ स्टार नॅथन अपोडाका (Nathan Apodaca) स्केटबोर्डींग टिकटॉक व्हिडिओची नॉन-फंजिबल टोकन म्हणून नोंदणी करत आहे. ज्याच्या बोलीची सुरुवातच 5 लाख डॉलर्सपासून सुरू झाली आहे. 1977मधील फ्लीटवुड मॅकच्या ड्रीम्स गाण्यावर लिप्सिंक करत क्रॅन-रासबेरीचा ज्यूस पीत मोकळ्या रस्त्यांवर स्केटबोर्ड घेऊन फिरत असल्याचा 23 सेकंदाचा हा टिकटॉक व्हिडिओ, त्यानं सप्टेंबर 2020 मध्ये पोस्ट केला होता.
    First published:

    Tags: Viral videos, Youtube

    पुढील बातम्या