जाहिरात
मराठी बातम्या / मनी / परवाना रद्द झाल्यानंतर 'या' बँकेच्या ठेवीदारांना मिळणार 5 लाखांपर्यंतची रक्कम परत, RBIचा मोठा निर्णय

परवाना रद्द झाल्यानंतर 'या' बँकेच्या ठेवीदारांना मिळणार 5 लाखांपर्यंतची रक्कम परत, RBIचा मोठा निर्णय

सतीश मानेशिंदे हे देशातील सर्वात महागड्या वकिलांच्या यादीतील प्रमुख नाव आहे. ते महागड्या गाड्यांच्या आवडीसाठीही ओळखले जातात. कोर्टात सादर होण्यासाठी एका दिवसाचे ते 10 लाख रुपये घेत असल्याचे सांगितले जात आहे. हा 2010 चा आकडा आहे.

सतीश मानेशिंदे हे देशातील सर्वात महागड्या वकिलांच्या यादीतील प्रमुख नाव आहे. ते महागड्या गाड्यांच्या आवडीसाठीही ओळखले जातात. कोर्टात सादर होण्यासाठी एका दिवसाचे ते 10 लाख रुपये घेत असल्याचे सांगितले जात आहे. हा 2010 चा आकडा आहे.

डीआयसीजीसी कायद्याअंतर्गत CKP को-ऑपरेटिव्ह बँकेच्या डिपॉझिटर्सना 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळेल

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) ने सीकेपी सहकारी बँकेच्या (CKP Cooperative Bank) बँकेचा परवाना केला आहे. मनीकंट्रोल ने दिलेल्या माहितीनुसार यामुळे जवळपास 11 हजार गुंतवणूकदार आणि ठेवीदार तर सव्वा लाख खातेधारकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सीकेपी सहकारी बँकेच्या नेटवर्थमध्ये झालेली घसरण हे बँकेचा परवाना रद्द होण्यामागचं महत्त्वाचं कारण असल्याची माहिती मनीकंट्रोलने दिली आहे. 2016 मध्ये बँकेची नेटवर्थ 146  कोटी होती जी आता 230 कोटींवर पोहोचली आहे. ऑपरेशनल फायदा होऊनही नेटवर्थमध्ये घसरण झाल्याने बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने रिव्हायव्हल किंवा अन्य एखाद्या बँकेबरोबर विलीनीकरणाची सुद्धा योजना नसल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

जाहिरात

(हे वाचा- बँक खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी दरवेळी बसणार 5 रुपयांचा भुर्दंड, वाचा कारण ) आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार बँक आता त्या परिस्थितीमध्ये नाही आहे की ती सध्याच्या किंवा भविष्यातील ठेवीदारांना पेमेंट करू शकेल. सध्याची परिस्थिती ठेवीदारांसाठी हानिकारक आहे. आरबीआयने त्यांच्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की, ‘सामान्य माणसं आणि ठेवीदारांच्या हिताचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती केवळ सध्याच्या डिपॉझिटर्ससाठी हानीकारक नाही आहे तर सामान्यांसाठी सुद्धा सुरक्षित नाही आहे.’ आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार सामान्यांचे हित लक्षात घेता या बँकेचे कोणतेही व्यवहार थांबवण्यात आले आहेत. डिपॉझिटर्सना मिळणार 5 लाख बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता लिक्विडेशन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे डीआयसीजीसी कायद्याअंतर्गत CKP को-ऑपरेटिव्ह बँकेच्या डिपॉझिटर्सना पेमेंट केले जाईल. बँकेच्या या डिपॉझिटर्सना त्यांच्या खात्यातील रकमेच्या हिशोबाने 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात