जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Tax Rule : 'या' 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची नसते गरज! ITR भरण्याआधी अवश्य घ्या जाणून

Tax Rule : 'या' 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची नसते गरज! ITR भरण्याआधी अवश्य घ्या जाणून

टॅक्स फ्री इन्कम

टॅक्स फ्री इन्कम

what income is tax free : तुम्ही देखील टॅक्सपेयर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण इन्कम टॅक्स भरण्याची वेळ जवळ आली आहे. अशा वेळी, तुमचे कोणते इन्कम टॅक्स कक्षेत येते आणि कोणते आयकर कक्षेबाहेर ठेवले आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून : जून जुलै महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची घाई असते. सर्वसामान्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे, जेवढे कमवाल तेवढाच जास्त टॅक्स भरावा लागेल. या गोष्टीविषयी टॅक्सपेयर्स नेहमीच दुविधेत असतात. मात्र असे अनेक लोक आहेत, ज्यांना पूर्ण सत्य माहिती नाही. काही उत्पन्न असे असतात. ज्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशाच उत्पन्नाविषयी सविस्तर…

News18लोकमत
News18लोकमत

तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर इन्कम टॅक्स आकारला जातो. यात फक्त सॅलरीचाच समावेश नसतो. सॅलरी व्यक्तिरिक्त बचतीतून मिळणारे व्याज, घरातून होत असलेली कमाई, साईड बिझनेस, कॅपिटल गेन्ससारख्या अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. परंतु असे काही स्त्रोत आहेत ज्यातून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त, इतर अनेक उत्पन्न आहेत जे कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहेत. टॅक्स एक्सपर्ट्सनुसार, इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 10 मध्ये अशा करमुक्त उत्पन्नाचा उल्लेख आहे. 1. शेतीतून मिळणारे उत्पन्न भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी, इन्कम टॅक्स कायदा 1961 मध्ये, शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेय. तुमच्याकडे शेतजमीन असेल आणि तुम्ही शेती किंवा संबंधित कामातून कमाई करत असाल तर तुम्हाला त्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. ITR Filling 2023: टॅक्स वाचवण्यात अडचणी येताय? या 10 पद्धतींनी वाचतील लाखो रुपये 2. हिंदू अविभक्त कुटुंब (HuF) कडून मिळालेली रक्कम हिंदू अविभक्त कुटुंब (HuF) कडून मिळालेली रक्कम किंवा वारसाच्या स्वरूपात मिळकत आयकराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे. अशा उत्पन्नाला आयकर कायद्याच्या कलम 10(2) अंतर्गत करमुक्त ठेवण्यात आलेय. या सेक्शनमध्ये म्हटले आहे की, कुटुंबाचे उत्पन्न, स्थावर मालमत्तेचे उत्पन्न किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नाही. बचत खात्यातील व्याज तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरील रकमेवर दर तिमाहीला व्याज मिळते. आयकर कायद्यानुसार हे तुमचे उत्पन्न आहे. यावर, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80TTA नुसार आयकर सूट मिळू शकते. बचत खात्यावरील वार्षिक व्याज 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्तीच्या रकमेवर आयकर भरावा लागेल. How To save Tax: स्टांप ड्यूटीवरही मिळते टॅक्स सूट, ITR भरताना करा एक काम; वाचेल भरपूर पैसा ग्रॅच्युइटीवर टॅक्स सूट एखादा कर्मचारी केंद्र किंवा राज्य सरकारसाठी काम करत असेल तर त्याला मिळणारी ग्रॅच्युइटी पूर्णपणे टॅक्स फ्री असते. मात्र, खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍याला जेव्हा एप्रीसिएशन टोकन मिळते, तेव्हा त्यासाठीचे Tax नियम वेगळे असतात. VRS वर मिळालेली रक्कम इन्कम टॅक्स कायदयाच्या नियम 2BA अंतर्गत, VRS म्हणून पाच लाख रुपयांपर्यंत मिळालेली रक्कम करमुक्त आहे. स्कॉलरशिप, अवार्ड एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप किंवा अवार्ड मिळाला ज्यातून तो अभ्यासाचा खर्च चालवत असेल, तर त्याला आयकर कायद्याच्या कलम 10 (16) अंतर्गत इन्कम टॅक्समधून सूट मिळते. यामध्ये रकमेची मर्यादा नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात