नवी दिल्ली,13 जून: तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रॉपर्टी खरेदी केली असेल आणि स्टांप ट्यूटी किंवा रजिस्ट्रेशन फिस भरली असेल, तर तुम्ही टॅक्स सूट मिळवू शकता. आयकरच्या कलम 80C अंतर्गत, स्टांप ड्यूटी, रजिस्ट्रेशन फिस इत्यादी भरण्यावर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची कपात मिळू शकते. परंतु, या सूटचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही अटी व शर्ती पूर्ण करणं गरजेचं असेल. कलम 80C अंतर्गत स्टांप ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन चार्ज भरणारे लोक ज्या वर्षी घर खरेदी केले त्या वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना सूटचा दावा करु शकतात.
स्टांप ड्यूटीवर टॅक्स सूटचा दावा वैयक्तिक मालक, सह-मालक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांद्वारे दावा केला जाऊ शकतो. संयुक्त मालकीच्या बाबतीत, सह-मालकांना त्यांच्या हिश्श्यानुसार सूट दिली जाते. यासाठी सर्व मालकांच्या नावावर मालमत्तेची नोंदणी केलेली असणं बंधनकारक आहे. यासोतबच त्यांनी स्टांप ड्यूटी भरलेली असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीच्या सह-मालकांव्यतिरिक्त इतर कोणी स्टांप ड्यूटी भरल्यास, टॅक्स सूटचा लाभ मालमत्तेच्या सह-मालकांना मिळणार नाही.
फक्त रेजिडेंशियल प्रॉपर्टीवर सूट
भारतीय आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C (xviii) (d) मध्ये मालमत्तेची खरेदी किंवा हस्तांतरण करताना मस्टांप ड्यूटीआणि रजिस्ट्रेशन फिस यांसारख्या खर्चांवर कर सूट देण्याची तरतूद आहे. या अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा केला जाऊ शकतो. मात्र महत्त्वाचं म्हणजे ही सूट केवळ निवासी प्रॉपर्टीवर मिळू शकते, कॉमर्शियल प्रॉपर्टीवर नाही.
ITR Filing: टॅक्स देण्याएवढी कमाई नाही तरीही फाइल करा आयटीआर, मिळतील अनेक फायदे!त्याच आर्थिक वर्षात पैसे दिलेले असावेत
ज्या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल केला जात आहे त्याच आर्थिक वर्षात स्टांप ड्यूटीवरील टॅक्स सूटचा लाभ मिळू शकतो. याचा अर्थ असा की 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR भरताना, तुम्ही या आर्थिक वर्षात भरलेल्या स्टॉप ड्युटीवरच सूट मागू शकता, मागील आर्थिक वर्षात खरेदी केलेल्या घरासाठी नाही.
ताबा केलेला असणे गरजेचे
तुम्ही फक्त त्याच रेजिडेंशियल प्रॉपर्टीसाठी भरलेल्या स्टांप ड्यूटीमध्ये सूट क्लेम करू शकता जी प्रथम मालक म्हणून तुमच्याकडे आहे. म्हणजेच प्रॉपर्टीचा ताबा तुमच्याकडे असायला हवा. अंडर-कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी स्टाम्प ड्यूटी टॅक्स बेनिफिट्सच्या योग्य नाही.
ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यापूर्वी चेक करा या गोष्टी, अन्यथा सापडाल अडचणीत5 वर्षांचा लॉक इन पीरियड
ज्या प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी भरलेल्या स्टांप ट्यूटीवर कर सवलत मिळाली आहे ती पाच वर्षांसाठी विकता येणार नाही. या कालावधीपूर्वी एखाद्याने मालमत्तेची विक्री केल्यास, ज्या वर्षात सूट मिळाली आहे त्या वर्षाचा आयटीआर सुधारित केला जातो आणि स्टांप ड्यूटी कपातीवर टॅक्स लागतो.
ही अट देखील लागू होते
स्टांप ड्यूटीवर टॅक्स कपातीसाठी, हे देखील आवश्यक आहे की तुम्ही कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांची कमाल सूट मर्यादा ओलांडलेली नसावी. म्हणजे, जर तुम्ही आधीच EPF, PPF, SCSS, जीवन विमा पॉलिसी, ELSS इत्यादी गुंतवणुकीवर 1.5 लाखांपर्यंत सूट घेतली असेल, तर तुम्ही स्टांप ड्यूटीवर टॅक्स सूटचा दावा करू शकत नाही. या गुंतवणुकीच्या पर्यायांवरील कपातीचा दावा केल्यानंतर तुम्ही 1.5 लाखांपेक्षा कमी सूट घेतली असेल, तर तुम्ही स्टांप ड्यूटी टॅक्स कपातीसाठी देखील पात्र आहात.