बचत करा आणि जमवा 1 कोटी! 'या' योजनेत दरमहा करा इतकी गुंतवणूक

बचत करा आणि जमवा 1 कोटी! 'या' योजनेत दरमहा करा इतकी गुंतवणूक

जर तुम्हाला एक कोटी रुपयांची बचत करायची असेल तर त्यासाठी आतापासूनच सुरुवात करा.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जुलै : जर तुम्हाला एक कोटी रुपयांची बचत करायची असेल तर त्यासाठी आतापासूनच सुरुवात करा. यासाठी तुम्ही सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची (SIP) मदत घेऊन शकता. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते 1 कोटींची रक्कम जमवणं कठिण असले तरी, सिस्टीमॅटिक बचत करून हे केले जाऊ शकते. SIP च्या माध्यमातून गुंतवणूकदार दरमहा म्युच्युअल फंड योजनांमध्ये (Mutual Fund Schemes) निश्चित रक्कम जमा करतात. ही रक्कम बर्‍याच काळासाठी जमा केली जाते. अशा परिस्थितीत SIP द्वारे आपले लक्ष्य साध्य करणे सोपे आहे आणि शेवटी, आपल्याला चांगले रिटर्नही मिळतात.

म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे प्लॅटफॉर्म असलेल्या Scripboxच्या मते, गुंतवणूकीच्या रकमेवरचे व्याज चक्रवाढ व्याजातून (Compound interest) वाढते. 1 कोटींची बचत करणारे गुंतवणूकीदार गुंतवणूकीच्या चक्रानुसार ही रक्कम बदलू शकतात.

वाचा-2 महिन्यांत आणखी वाढणार सोन्याची किंमती, असे असू शकतात दर

7 हजार रुपयाच्या बचतीनं पूर्ण होऊ शकते लक्ष्य

Scripboxच्या मते दरमहा 7,000 रुपयांची बचत झाल्यानंतरही SIP मार्फत 20 वर्षांत 1 कोटी रुपयांची रक्कम मिळू शकते. यासाठी म्युच्युअल फंडावर मिळणारा SIP परताव्याचा दर 10 टक्के मानला जातो. Scripbox चे सहसंस्थापक प्रितीक मेहता म्हणतात की, "याचा अर्थ असा नाही की ही रक्कम कमी किंवा अधिक नाही होऊ शकत. गुंतवणूकीसाठी घेतलेला वेळ दीर्घकालीन नफा किंवा तोटा रद्द करू शकतो आणि परताव्याचा दर सुसंगत बनवू शकतो. दरम्यान, SIP मार्केटमधील चढ-उतारांवर सरासरी नफा देते.

वाचा-जब चाहो लखपती बनो! दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून असा मिळवा लाखोंचा फायदा

10 वर्षातही होऊ शकता कोट्याधीश

आता जर तुम्हाला 10 वर्षात 1 कोटी रुपये (Crorepati in 10 Years) वाचवायचे असतील तर तुम्हाला दरमहा 33,000 रुपयांची बचत करावी लागेल. जर तुम्ही ही रक्कम सलग 10 वर्षे 10 टक्के दराने गुंतवणूक केली तर तुम्हाला परतावा म्हणून 1 कोटी रुपये मिळू शकतात. आपण आपल्या गुंतवणूकीच्या लक्ष्याचा अंदाज लावू इच्छित असल्यास आपण स्क्रिप्टबॉक्सच्या SIP कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता.

वाचा-याठिकाणी एफडीवर मिळत आहे 9 टक्के व्याज, कमी कालावधीत होतील पैसे दुप्पट

Published by: Priyanka Gawde
First published: July 12, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या