2 महिन्यांत आणखी वाढणार सोन्याची किंमती, असे असू शकतात दर

सोन्याच्या किंमती वाढण्याची काय आहेत कारणं जाणून घ्या.

सोन्याच्या किंमती वाढण्याची काय आहेत कारणं जाणून घ्या.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 जुलै: जानेवारीमध्ये सराफ बाजारात सुरू झालेली सोन्याची तेजी अद्यापही दर उतरण्याचं नाव घेत नाही. यंदा सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. 10 ग्राम सोन्याचे दर 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून येत्या दोन महिन्यात आणखीन दोन हजार रुपयांनी वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय सराफा बाजारात दिवाळीआधी सोन्याच्या किंमती सध्याच्या पातळीवर प्रति 10 ग्रॅम 2000 रुपयांवरून वाढून 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात. एकूणच सोन्याच्या वाढणाऱ्या किंमतींचा विचार करता 2021 मध्ये सोन्याची प्रति तोळा 65 हजार रुपयांवर पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको. सोन्याच्या किंमती वाढण्याची काय आहेत कारणं 1. कोरोनाचं महासंकट आणि त्याचे परिणाम कोरोना विषाणूच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणात मंदीसारखी स्थिती निर्माण होईल त्यामुळे सराफ बाजारातील देव-घेव संथ होऊ शकते. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, जागतिक उत्पादन घट होऊन 4..9 टक्क्यांवर येईल, तर विकसनशील देशांमध्ये वाढीचा दर 3 टक्क्यांपर्यंत खाली येईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडे वळू शकतात. हे वाचा-जब चाहो लखपती बनो! दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून असा मिळवा लाखोंचा फायदा 2. डॉलरचे मूल्य कमी झाल्यामुळे कोरोना साथीच्या आजारापासून देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढतील. 3. भारत-चीन तणाव अमेरिका आणि चीन आणि भारत-चीन यांच्यातील तणावामुळे सोन्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: