मराठी बातम्या /बातम्या /मनी /

जब चाहो लखपती बनो! दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून असा मिळवा लाखोंचा फायदा

जब चाहो लखपती बनो! दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून असा मिळवा लाखोंचा फायदा

जर तुम्ही बचत केली तर तुम्हाला काही महिन्यांत लखपती होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी एका सरकारी बॅकेंच्या वतीनं एक खास योजना तयार करण्यात आली आहे.

जर तुम्ही बचत केली तर तुम्हाला काही महिन्यांत लखपती होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी एका सरकारी बॅकेंच्या वतीनं एक खास योजना तयार करण्यात आली आहे.

जर तुम्ही बचत केली तर तुम्हाला काही महिन्यांत लखपती होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी एका सरकारी बॅकेंच्या वतीनं एक खास योजना तयार करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 12 जुलै : जर तुम्ही बचत केली तर तुम्हाला काही महिन्यांत लखपती होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी एका सरकारी बॅकेंच्या वतीनं एक खास योजना तयार करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या (Central Bank of India) एका योजनेच्या आधारे एका वर्षात तुम्ही लखपती होऊ शकता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीनं सेंट लखपती (Cent Lakhpati) नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केवळ 595 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही लखपती होऊ शकतो. अशी आहे बॅंकेची योजना सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 'जब चाहो लखपती बनो' या टॅगलाइन अंतर्गत ही योजना डिसेंबर 2016 मध्ये सुरु केली होती. या योजनेअंतर्गत 1 वर्षापासून 10 वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत एका वर्षामध्ये लखपती बनायचे आहे, तर तुम्हाला दर महिन्याला थोडी जास्त गुंतवणूक करावी लागेल. मात्र त्यापेक्षा जास्त कालावधी देखील तुम्ही निवडू शकता. या योजनेअंतर्गत बँक दोन प्रकारे तुम्हाला व्याजदर देते. एका वर्षासाठी तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 6.65 टक्के व्याज मिळते. तर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर 6.45 टक्के व्याज दिले जाते. वाचा-याठिकाणी एफडीवर मिळत आहे 9 टक्के व्याज, कमी कालावधीत होतील पैसे दुप्पट एका वर्षात असे व्हा लखपती या योजनेअंतर्गत तुम्हाला एका वर्षापासून दहा वर्षापर्यंत फायदा मिळेल. एका वर्षामध्ये लाखोंचा फायदा हवा असेल तर तुम्हाला दरमहा 8040 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही ही गुंतणूक 1 वर्षासाठी केली तर तुम्हाला वर्षाअखेर बँकेकडून 1 लाख रुपये मिळतील. या योजनेत तुम्हाला 6.65 टक्के व्याज मिळेल. सेंट लखपती या योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर 1 लाख मिळतील, त्यासाठी तुम्हाला दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला 5 वर्षामध्ये लक्षाधीश व्हायचे असेल तर प्रति महिना 1,411 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. वाचा-शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! FPOअंतर्गत मिळणार 15 लाख रुपये,सरकारकडून गाइडलाइन जारी वाचा-'फोनमध्ये आलेला OTP सांगाल का?' सतर्क न राहिल्यास खाते कामे होण्याची शक्यता
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या