मुंबई, 16 नोव्हेंबर : सिगाची इंडस्ट्रीजचे (Sigachi Industries Share) शेअर्स मंगळवारीही तेजीत राहिले. सोमवारीच सिगाची इंडस्ट्रीजने बंपर लिस्टिंगसह शेअर बाजारात प्रवेश केला. मंगळवारी ट्रेडिंग सुरू होताच, सिगाची इंडस्ट्रीजचे शेअर्स 5 टक्क्यांच्या उसळीसह अप्पर सर्किटमध्ये होते आणि त्याची किंमत BSE वर 633.9 रुपये प्रति शेअरवर पोहोचली. सोमवारी, सिगाची शेअर्स सुमारे 250 टक्के प्रीमियमवर लिस्टिंग झाल्यानंतर 603.8 रुपयांवर बंद झाला. 2021 मध्ये आलेल्या IPO मध्ये सिगाचीचा लिस्टिंग नफा हा सर्वाधिक आहे.
सिगाचीने पारस डिफेन्स, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, तत्व चिंतन आणि क्लीन सायन्सला मागे टाकले. हे स्टॉक मार्केटमध्ये सुमारे 98-171 टक्क्यांच्या प्रीमियमसह लिस्टिंग झाले होते.
बहुतेक विश्लेषक (Share Market Experts) लाँग टर्मसाठी सिगाची स्टॉकवर पॉझिटिव्ह आहेत. इक्विटी 99 अॅडव्हायझरीचे सह संस्थापक राहुल शर्मा सुचवतात की गुंतवणूकदार कंपनीच्या स्पेशियालिटी प्रोडक्ट्सच्या रेंजचा विचार करून सिगाचीमध्ये गुंतवणूक करू शकतात. लिस्टिंग प्रॉफिटकडे पाहता, शॉर्ट टर्मच्या गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केला पाहिजे. कारण गेल्या 10 ते 15 दिवसांत त्यांचे पैसे जवळजवळ तिप्पट झाले आहेत. नवीन गुंतवणूकदारांनी थोडीशी घट होण्याची प्रतीक्षा करावी.
SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?
सिगाची कंपनीबद्दल माहिती
सध्या, कंपनी 59 वेगवेगळ्या ग्रेडचे मायक्रोक्रिस्टलाईन सेल्युलोज तयार करते. कंपनीचे प्लांट हैदराबाद आणि गुजरातमध्ये आहेत. त्यांची क्षमता 11,880 MTPY आहे. कंपनी गेल्या 30 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. गेल्या 30 वर्षांत कंपनी थ्री मल्टी लोकेशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसह प्रीमियम दर्जाची उत्पादने वितरीत करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. ही मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज (MCC) ची आघाडीची उत्पादक आहे.
OMG! महिलेनं भल्यामोठ्या मगरीला मारली मिठी; अंगावर काटा आणणारा VIDEO
कंपनीने नुकताच Gujarat Alkalies and Chemicals (GACL) सोबत करार केला आहे ज्या अंतर्गत ती GACL च्या कंपन्यांच्या उत्पादन युनिट्सचे संचालन आणि व्यवस्थापन पाहणार आहे. सिगाची इंडस्ट्रीज या कंपन्यांसाठी सोडियम क्लोरेट, स्थिर ब्लीचिंग पावडर आणि पॉली अॅल्युमिनियम क्लोराईड तयार करण्यासाठी देखील जबाबदार असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market