• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?

SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?

SBI बँक तुम्हाला YONO कॅशची (YONO Cash) सुविधा देते. याच्या मदतीने तुम्ही एटीएम तसेच पीओएस टर्मिनल्स आणि कस्टमर सर्व्हिस पॉइंट्स (CSP) मधून पैसे काढू शकाल.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर : अनेक बँका आपल्या ग्राहकांच्या सोईच्या दृष्टीने अनेक सुविधा त्यांच्यासाठी घेऊन येत आहेत. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल आणि पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड (ATM Card) नेण्यात अडचण येत असेल किंवा एटीएम कार्ड घरी विसरला असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण एसबीआय आपल्या ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देते. यासाठी बँक तुम्हाला YONO कॅशची (YONO Cash) सुविधा देते. याच्या मदतीने तुम्ही एटीएम तसेच पीओएस टर्मिनल्स आणि कस्टमर सर्व्हिस पॉइंट्स (CSP) मधून पैसे काढू शकाल. यासाठी तुमच्या फोनमध्ये एसबीआयचे योनो अॅप असले पाहिजे. या अॅपद्वारे तुम्ही देशातील कोणत्याही एसबीआय एटीएममधून (SBI ATM) पैसे काढू शकता. या सुविधेद्वारे, तुम्ही SBI ATM मधून किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकता. SBI ATM वर ही प्रोसेस फॉलो करा >>सर्वप्रथम YONO अॅप ला लॉगिन करा. >> यानंतर होम पेजवर YONO Cash वर क्लिक करा. >> आता YONO Cash मध्ये ATM सेक्शनमध्ये क्लिक करा. >> त्यानंतर रक्कम एंटर करा. >> आता 6 अंकी पिन बनवावा लागेल. यानंतर YONO कॅश ट्रान्जॅक्शन नंबर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल. तो 6 तासांसाठी वैध राहतो. >> ATM वर YONO कॅश पर्यायावर टॅप करा. यानंतर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला YONO कॅश ट्रान्जॅक्शन नंबर आणि तुम्ही तयार केलेला 6 अंकी पिन टाकावा लागेल. >> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही रोख रक्कम कलेक्ट करू शकता.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: