मराठी बातम्या /बातम्या /मनी /Sigachi Industries ची शेअर बाजारात दमदार एन्ट्री; शेअर 575 रुपयांवर लिस्ट

Sigachi Industries ची शेअर बाजारात दमदार एन्ट्री; शेअर 575 रुपयांवर लिस्ट

Sigachi Industries कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज 163 रुपये आहे, परंतु BSE वर कंपनीचे शेअर्स 575 रुपयांवर उघडले. कंपनीच्या शेअर्सची मजबूत लिस्टिंग (Sigachi Industries Listing) आधीच अपेक्षित होती कारण ग्रे मार्केटमध्ये (Gray Market) कंपनीच्या अनलिस्टेड शेअर्सचा प्रीमियम जास्त होता.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 नोव्हेंबर : मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज कंपनी सिगाची इंडस्ट्रीजच्या शेअर्सची (Sigachi Industries stock price) लिस्टिंग 15 नोव्हेंबर जबरदस्त झाली आहे. कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज 163 रुपये आहे, परंतु BSE वर कंपनीचे शेअर्स 575 रुपयांवर उघडले. कंपनीच्या शेअर्सची मजबूत लिस्टिंग (Sigachi Industries Listing) आधीच अपेक्षित होती कारण ग्रे मार्केटमध्ये (Gray Market) कंपनीच्या अनलिस्टेड शेअर्सचा प्रीमियम जास्त होता.

सिगाची इंडस्ट्रीजने 125.43 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला होता, जो गुंतवणूकदारांनी सहजरित्या घेतला. इश्यू 1 नोव्हेंबरला उघडला आणि 3 नोव्हेंबरला बंद झाला. सिगाची इंडस्ट्रीजचा इश्यू एकूण 101.91 पटीने सबस्क्राईब झाला. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल खरेदीदारांसाठी राखीव भाग 86.51 पटीने सबस्क्राईब झाला आहे. तर नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांचा हिस्सा 172.43 पट सबस्क्राइब झाला. तर किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 80.49 पट भरला गेला.

फक्त 53 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 35 लाख रुपये!

सध्या, कंपनी 59 वेगवेगळ्या ग्रेडचे मायक्रोक्रिस्टलाईन सेल्युलोज तयार करते. कंपनीचे प्लांट हैदराबाद आणि गुजरातमध्ये आहेत. त्यांची क्षमता 11,880 MTPY आहे. कंपनी गेल्या 30 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. गेल्या 30 वर्षांत कंपनी थ्री मल्टी लोकेशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसह प्रीमियम दर्जाची उत्पादने वितरीत करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. ही मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज (MCC) ची आघाडीची उत्पादक आहे.

SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?

कंपनीने नुकताच Gujarat Alkalies and Chemicals (GACL) सोबत करार केला आहे ज्या अंतर्गत ती GACL च्या कंपन्यांच्या उत्पादन युनिट्सचे संचालन आणि व्यवस्थापन पाहणार आहे. सिगाची इंडस्ट्रीज या कंपन्यांसाठी सोडियम क्लोरेट, स्थिर ब्लीचिंग पावडर आणि पॉली अॅल्युमिनियम क्लोराईड तयार करण्यासाठी देखील जबाबदार असेल.

First published:

Tags: Investment, Money, Share market