मुंबई, 15 नोव्हेंबर : अनेकांना नोकरी (Job) करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करण्याची इच्छा असते; पण काही वेळा कोणता व्यवसाय करावा हे कळत नसतं. अनेकदा व्यवसाय करण्यासाठी लागणारं मोठे भांडवल अनेकांकडे उपलब्ध नसतं. अशा वेळी कमी भांडवलात चांगली कमाई करणाऱ्या एका व्यवसायाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा व्यवसाय आहे कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय (Kadaknath Chicken). यात अगदी कमी गुंतवणूक करून लाखोंची कमाई करता येते.
कडकनाथ म्हणजे काळी कोंबडी (Black Chicken). आदिवासी भागात या कोंबड्यांना कालीमासी म्हणतात. त्यांचं मांस आरोग्यासाठी लाभदायक मानलं जातं. औषधी गुणधर्मामुळे कडकनाथ कोंबड्यांना मांसासाठी मोठी मागणी आहे. कडकनाथ कोंबड्या मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) झाबुआ जिल्ह्यात आढळतात. त्यामुळे मध्य प्रदेशातल्या कडकनाथ कोंबडीला जीआय टॅग (GI Tag) मिळाला आहे. कडकनाथ कोंबड्या एकमेवाद्वितीय आहेत, असा या टॅगचा अर्थ होतो. कडकनाथ कोंबड्यांचा बहुतांश व्यवसाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होतो; मात्र देशातल्या अनेक राज्यांमध्येही याचा प्रसार झाला आहे.
कडकनाथ कोंबडी महाग का विकली जाते?
कडकनाथ कोंबडीचा रंग काळा, मांस आणि रक्तही काळं असतं. या कोंबडीच्या मांसामध्ये लोह, प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतात तर फॅट आणि कोलेस्टेरॉल कमी प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयविकार (Heart Problems) आणि मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी हे कडकनाथ चिकन अतिशय फायदेशीर मानलं जातं. हे चिकन खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषकतत्त्वं मिळतात. त्यामुळे त्यांची मागणी मोठी असते. हे लक्षात घेऊन सरकारही त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करतं.
SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?
सरकार कशी मदत करतं?
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकार कडकनाथ कोंबडीपालनाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. छत्तीसगडमध्ये केवळ 53 हजार रुपये जमा केल्यावर 1000 पिल्लं, 30 कोंबड्यांची शेड आणि सहा महिन्यांसाठी मोफत खाद्य तीन हप्त्यांमध्ये सरकारकडून दिलं जातं. त्याचबरोबर लसीकरण आणि आरोग्य सेवेची जबाबदारीही सरकार उचलतं. कोंबड्या विक्रीसाठी तयार झाल्यावर विक्रीसाठी मार्केटिंगची जबाबदारीही सरकार उचलतं. मध्य प्रदेश सरकारही या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना राबवत आहे. या कोंबड्यांची मागणी सध्या इतकी वाढत आहे, की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची कृषी विज्ञान केंद्रं मागणीएवढा पुरवठा करू शकत नाहीत. यावरून यातून होणाऱ्या कमाईचा अंदाज लावता येतो.
हा व्यवसाय कसा सुरू करायचा?
तुम्हाला कडकनाथ कोंबड्या पाळायच्या असतील तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्रातून पिल्लं घेऊ शकता. काही शेतकरी 15 दिवसांची पिल्लं घेतात, तर काही जण एक दिवसाची पिल्लं घेतात. कडकनाथचं पिल्लू साडेतीन ते चार महिन्यांत विक्रीसाठी तयार होतं. कडकनाथ कोंबडीच्या पिल्लाचा दर 70 ते 100 रुपये आहे. एका अंड्याचा (Eggs) दर 20-30 रुपयांपर्यंत आहे.
राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण
नफा किती होईल?
कडकनाथ कोंबडीची किंमत बाजारात 3000 ते 4000 रुपये आहे, तर मांस 700-1000 रुपये किलोपर्यंत विकलं जातं. जेव्हा हिवाळ्यात मांसाचा वापर वाढतो, तेव्हा कडकनाथ कोंबडीच्या मांसाची किंमत 1000-1200 रुपये किलोपर्यंत पोहोचते. तुम्ही सरकारकडून 53,000 रुपयांमध्ये कोंबडीची 1000 पिल्लं विकत घेतली. एका कोंबडीचं सरासरी मांस 3 किलो असलं, तर हिवाळ्याच्या एका हंगामात तब्बल 35 लाखांपेक्षा जास्त कमाई करणं शक्य आहे. 6 महिन्यांकरिता कोंबड्यांसाठी खाद्य, तसंच शेड बनवण्यासाठी खर्च करण्याचीही गरज नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Government, Investment, Money