Home /News /money /

याठिकाणाहून शिर्डी-शनि शिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी खास ऑफर, स्वस्तात करा प्रवास

याठिकाणाहून शिर्डी-शनि शिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी खास ऑफर, स्वस्तात करा प्रवास

IRCTC Tour Package: जर तुम्ही यावर्षी मार्चमध्ये शिर्डी किंवा शनि शिंगणापूरला जायचा विचार करत असाल तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आले आहेत. वाचा काय आहे ऑफर

    नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी:  दरवर्षी शेकडो भक्त शिर्डी (Shirdi) आणि शनि शिंगणापूर (Shani Shinganapur) याठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. दिल्लीतूनही हजारो भाविक याठिकाणी येतात. आयआरसीटीसीची ही योजना देखील खास दिल्लीकरांसाठी आहे. जर तुम्ही यावर्षी मार्चमध्ये शिर्डी किंवा शनि शिंगणापूरला जायचा विचार करत असाल तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आले आहेत. यामुळे तुम्ही कमी खर्चामध्ये शिर्डी आणि शनि शिंगणापूर फिरू शकता. जाणून घ्या काय आहे हे टूर पॅकेज आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ही टूर 13 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे. हे टूर पॅकेज 2 दिवस आणि एका रात्रीचं असणार आहे. हा प्रवास फ्लाइटचा असणार आहे आणि त्याची सुरुवात दिल्लीहून होणार आहे. पहिला दिवस -दिल्ली एअरपोर्टवरून दुपारी 2.20 वाजता फ्लाइट (SG-887) असणार आहे जी 04.10 मिनिटांनी शिर्डी विमानतळावर पोहोचेल. -शिर्डी एअरपोर्टवरून एसी कारने हॉटेलपर्यंत नेण्यात येईल (हे वाचा-इंधनवाढीबाबत पेट्रोलियम मंत्र्यांनी सोडलं मौन, या गोष्टीवर फोडलं खापर) -संध्याकाळी शिर्डीमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी देखील नेण्यात येईल, यानंतर भाविकांना साई दर्शन देखील घेता येणार आहे -रात्री हॉटेलमध्ये परत आणले जाईल दुसरा दिवस -दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर भाविकांना शनि शिंगणापूर याठिकाणी नेण्यात येईल. दर्शन घेतल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारचे जेवण करून चेक आउट केले जाईल -यानंतर तुम्हाला शिर्डी एअरपोर्टवर 3 वाजेपर्यंत पोहोचावे लागेल. जिथून तुम्हाला दिल्लीसाठी फ्लाइट मिळेल. -ही फ्लाइट (SG-888) संध्याकाळी 04.40 वाजता आहे, जी दिल्लीमध्ये 06.30 वाजता पोहोचेल. किती आहे खर्च? वेबसाइटनुसार, या पॅकेजसाठी तुम्हाला 13,625 खर्च करावे लागतील. यामध्ये फ्लाइटचा खर्च, हॉटेल, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. कोणत्याही नैसर्गिक किंवा सामाजिक आपत्तीसाठी IRCTC जबाबदार असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (हे वाचा-SBIच्या या खास योजनेत करा गुंतवणूक; कधीही पैसे जमा करण्याची मुभा) शिर्डी साई बाबा मंदिरात जाण्यासाठी कोव्हिड-19बाबत मार्गदर्शक सूचना आयआरसीटीसीच्या वेबसाइटनुसार, शिर्डी येथे येणार्‍या लोकांना मंदिराचं गेट/शिर्डी विमानतळावर कोव्हिड निगेटिव्ह असल्याचा आरटी-पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. शिवाय शासनाने मंजुर केलेला आयडी प्रूफ सर्व भाविकांसाठी अनिवार्य आहे. इतर माहितीसाठी आपण आयआरसीटीसी https://www.irctctourism.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IRCTC, Sai Baba Of Shirdi (Deity), Shani shingnapur, Shirdi, Shirdi Airport

    पुढील बातम्या