मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एका वर्षात 250 टक्क्यांपेक्षा जास्त बंपर रिटर्न! 34 रुपयांचा शेअर पोहोचला 130 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का हा Stock?

एका वर्षात 250 टक्क्यांपेक्षा जास्त बंपर रिटर्न! 34 रुपयांचा शेअर पोहोचला 130 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का हा Stock?

Share Market Investment: गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत समारे 283 टक्के परतावा दिला आहे.

Share Market Investment: गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत समारे 283 टक्के परतावा दिला आहे.

Share Market Investment: गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत समारे 283 टक्के परतावा दिला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: गेल्या काही काळापासून शेअर मार्केट (Share Market Investment) तेजीत आहे. अनेक गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये (Share Market News Update) पैसे गुंतवून चांगली कमाई केली आहे. यावर्षी असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock Investment) आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. दरम्यान या शेअरने केवळ 1 वर्षात मोठा रिटर्न दिला आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड-सेलच्या शेअरबद्दल (Shares of Steel Authority of India Ltd- SAIL) आम्ही सांगत आहोत. गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत समारे 283 टक्के परतावा दिला आहे.

या देशांतर्गत स्टील दिग्गज कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीतील कमाईची नोंद केल्यानंतर हा फायदा दिसून आला. आज हा शेअर BSE वर 122.20 वर व्यवहार करत आहे.

हे वाचा-सामान्यांसाठी खूशखबर! दिवाळीआधी स्वस्त झालं खाद्यतेल, मुख्य कंपन्यांनी घटवले दर

गेल्या एका वर्षात या शेअरने दिला 250% परतावा

या लार्ज-कॅप स्टॉकने गेल्या 12 महिन्यांत आपल्या शेअर होल्डर्सना 250 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत सुमारे 283 टक्के परतावा दिला आहे. 51,000 कोटींहून अधिक बाजार भांडवलासह, स्टॉक 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजवर व्यापार करत आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा

कंपनीने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 4,338.75 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, जो वर्षभराच्या आधारावर 10 पटीने जास्त आहे. गेल्या वर्षी या कालावधीत नफा 436.52 कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक 58 टक्क्यांनी वाढून 27,007 कोटी रुपये झाले आहे.

हे वाचा-Nykaa IPO allotment: तुमच्या खात्यात शेअर्स आले की पैसे? अशाप्रकारे तपासा

जाणून घ्या कंपनीबद्दल

SAIL ही भारतातील सर्वात मोठी स्टील बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही महारत्न कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक आहे. ही कंपनी प्रामुख्याने भारताच्या पूर्व आणि मध्य भागात असलेल्या आणि कच्च्या मालाच्या देशांतर्गत स्त्रोतांच्या जवळ असलेल्या पाच एकात्मिक संयंत्रांमध्ये आणि तीन विशेष स्टील प्लांटमध्ये लोह आणि स्टीलचे उत्पादन करते.

First published:

Tags: Money, Share market