Home /News /money /

IPO listing : पुढील आठवड्यात पाच कंपन्याचे शेअर लिस्ट होणार, वाचा डिटेल्स

IPO listing : पुढील आठवड्यात पाच कंपन्याचे शेअर लिस्ट होणार, वाचा डिटेल्स

पुढील आठवड्यात 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहेत. या पाच कंपन्यांमध्ये MapmyIndia, Shriram Properties, Metro Brands, MedPlus Health Services आणि Data Pattern या कंपन्यांचा समावेश आहे.

    मुंबई, 19 डिसेंबर : शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून पडझड सुरु आहे. बर्‍याच कंपन्या त्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) जारी करत आहेत आणि नंतर स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग होत आहेत. 20 डिसेंबरपासून सुरू होणारा आठवडाही याला अपवाद नाही कारण या काळात 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहेत. या पाच कंपन्यांमध्ये MapmyIndia, Shriram Properties, Metro Brands, MedPlus Health Services आणि Data Pattern या कंपन्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याशिवाय 20 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान तीन IPO देखील उघडणार आहेत. यामध्ये Vivo Collaboration Solutions, CMS Info Systems आणि Brandbucket Media & Technology चे IPO समाविष्ट आहेत. MapMyIndia CE Info Systems चा IPO, जो MapmyIndia ला लोकेशन आणि नेव्हिगेशन सेवा पुरवते तो 9 डिसेंबर रोजी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि 155 वेळा सबस्क्राईब झाला आहे. कंपनी 22 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. `या` मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 1 लाख बनले 91 लाख! Shriram Properties बंगळुरूस्थित रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा IPO 8 डिसेंबरला उघडला आणि 10 डिसेंबरला बंद झाला. तो 4.6 वेळा सबस्क्राईब झाला. कंपनी 20 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. Metro Brands चप्पल-शूज किरकोळ विक्रेते मेट्रो ब्रँड्सचा IPO 10 ते 14 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. तो 3.64 वेळा सबस्क्राईब झाला. कंपनी 22 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. Star Health Insurance IPO मध्ये गुंतवणूकदारांचं 10 टक्के नुकसान, मात्र राकेश झुनझुनवालांनी कमावले 5418 कोटी MedPlus फार्मसी रिटेल चेन मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO, भारतातील दुसरी सर्वात मोठी फार्मसी रिटेलर, 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. हा आयपीओ 52.6 वेळा सबस्क्राईब झाला. कंपनी 23 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. Data Patern डेटा पॅटर्न (इंडिया) लि., डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रांना इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीचा IPO 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. तो 119 वेळा सबस्क्राईब झाला. कंपनी 24 डिसेंबरला शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या