मुंबई, 18 डिसेंबर: जोखीम असली तरी चांगले रिटर्न्स (Returns) मिळतील, या अपेक्षेनं शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणून काही गुंतवणूकदार पेनी स्टॉक (Penny Stocks) खरेदी करतात. ज्यावेळी अशा स्टॉकची किंमत वाढते तेव्हा त्यातून अपेक्षित रिटर्न मिळण्याची शक्यता असते. परंतु, अनेकदा अशा रिटर्नसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. ब्राइटकॉम ग्रुप या मल्टीबॅगर स्टॉकच्या बाबत (Multibagger Stocks) हेच म्हणता येईल. सध्या या स्टॉकची किंमत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वधारल्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळताना दिसत आहे.
पैसे प्रतीक्षा करून कमावले जातात, खरेदी किंवा विक्री करुन नव्हे, असं प्रख्यात अमेरिकी गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांनी एकदा सांगितलं होतं. बर्कशायर हॅथवेच्या उपाध्यक्षांचं हे विधान हैदराबादमधील डिजिटल मार्केटिंग कंपनी स्टॉक ब्राइटकॉम ग्रुपला (Brightcom Group) तंतोतंत लागू पडतं. गेल्या तीन वर्षात हा स्टॉक 2.16 रुपयांवरून 195.90 रुपयांवर पोहोचला आहे. या स्टॉक अर्थात समभागानं त्याच्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
नवीन वर्ष सुरू होत असताना, 2022 मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, असे संकेत या स्टॉकच्या सदयस्थितीवरून मिळत आहेत. गेल्या एका आठवड्यात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किट जवळ (Upper Circuit) येत 16 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.
80 टक्के वाढ
मागील एक महिन्यात हा पेनी स्टॉक सुमारे 108 रुपयांवरून 195.90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत सुमारे 80 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गत 6 महिन्यांत शेअर बाजारात हा मल्टीबॅगर स्टॉक 12.20 रुपयांवरुन 195.90 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत या स्टॉकने सुमारे 1500 टक्के वाढ नोंदवली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी `एनएसई`वर (NSE) सूचीबध्द झालेला हा मल्टी बॅगर स्टॉक सुमारे 7 रुपयांवरून 195.90 रुपयांपर्यंत वधारला आहे. त्यामुळे याच्या शेअर धारकांना सुमारे 2700 टक्के परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे गत वर्षभरात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 4.24रुपयांवरून 195.90 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की मागील एका वर्षात या पेनी स्टॉकमध्ये 4500 टक्के वाढ झाली आहे.
Mutual Fund : SIP सुरु करण्याची योग्य तारीख कोणती? पेमेंट वेळेत न झाल्यास काय होतं?
ब्राइट कॉम ग्रुपच्या या शेअरच्या इतिहासावर नजर टाकल्यास, 4 जानेवारी 2019 रोजी या डिजीटल मार्केटिंग कंपनीच्या (Digital Marketing Company) शेअरची `एनएसई`वर किंमत 2.16 रुपये होती. 17 डिसेंबर 2021 रोजी ही किंमत वाढून 195.90 रुपये झाली. त्यानुसार या शेअरने सुमारे 3 वर्षांच्या कालावधीत आपल्या शेअर धारकांना 9000 टक्के परतावा दिला असल्याचं दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market