मुंबई, 18 डिसेंबर : शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना अलीकडेच लिस्टिंग झालेल्या स्टॉकने 5418 कोटी रुपये किंवा 421 टक्के नफा दिला, तर IPO गुंतवणूकदारांना 10 टक्के तोटा झाला. विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या (Star Health and Allied Insurance Company) शेअरची लिस्टिंग 10 डिसेंबर 2021 रोजी होती.
राकेश झुनझुनवाला स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे प्रमोटर
भारताचे वॉरेन बफे म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला या कंपनीचे प्रमोटर आहेत आणि त्यांची या कंपनीत 14.98 टक्के भागीदारी आहे. बुधवारी व्यवहाराच्या शेवटी, स्टार हेल्थचे शेअर्स 900 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 809 रुपयांवर बंद झाले, म्हणजेच IPO गुंतवणूकदारांचे भांडवल सुमारे 10 टक्क्यांनी कमी झाले आहे.
22रुपयांचा हा शेअर एका वर्षात झाला 354रुपये,1 लाखाचे झाले 16 लाखांहून अधिक रुपये
झुनझुनवाला यांना स्टार हेल्थचे शेअर्स 83 टक्के डिस्काउंटवर मिळाले
स्टार हेल्थच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार, राकेश झुनझुनवाला यांनी मार्च 2019 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान या विमा कंपनीमध्ये 14.98 टक्के हिस्सा खरेदी केला. झुनझुनवाला यांनी आपले 8.28 कोटी शेअर्स केवळ 155.28 रुपयांना विकत घेतले होते. ही किंमत कंपनीच्या IPO साठी निश्चित केलेल्या प्राइस बँडच्या वरच्या किमतीच्या जवळपास 83 टक्के कमी आहे.
Motilal Oswal ची 'या' फर्टिलायझर शेअरला BUY रेटिंग, 40 टक्के परताव्याची शक्यता
याशिवाय राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडेही स्टार हेल्थचे शेअर्स आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थमध्ये 1.78 कोटी शेअर्स आहेत, जे कंपनीतील 3.23 टक्के शेअर्सच्या बरोबरीचे आहेत. त्यांची हिस्सेदारी 1454 कोटी रुपये आहे.
राकेश झुनझुनवाला यांची स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक
एकूण शेअर्सची संख्या: 8.28 कोटी
स्टेक होल्डिंग: 14.98 टक्के
सरासरी खरेदी किंमत: 155.28 रुपये प्रति शेअर
बुधवारची बंद किंमत: प्रति शेअर 809 रुपये
परतावा: 421 टक्के
खरेदी मूल्य: 1,287 कोटी
स्टेकहोल्डिंगचे सध्याचे मूल्यः 6,705 कोटी रुपये
निव्वळ नफा: 5,418 कोटी रुपये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market