World Cup : मांजरेकरांचा टिवटिवाट, भारताच्या कामगिरीपेक्षा आफ्रिकेचा विजय मोठा!

World Cup : मांजरेकरांचा टिवटिवाट, भारताच्या कामगिरीपेक्षा आफ्रिकेचा विजय मोठा!

ICC World Cup स्पर्धेच्या सुरुवातीपासून संजय मांजरेकर हे त्यांच्या कमेंट्रीमुळे ट्रोल झाले आहेत.

  • Share this:

लंडन, 07 जुलै : भारताने वर्ल्ड कपमध्ये 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेत भारताचा एका सामन्यात इंग्लंडकडून पराभव झाला तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियानंसुद्धा 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांचा भारत आणि आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला. या पराभवानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी केलेल्या ट्विटने पुन्हा एकदा सोशल मिडियावर ट्रोलिंग सुरु झाले आहे.

संजय मांजरेकर यांनी भारताच्या कामगिरीपेक्षा दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव बेस्ट होता असं ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भारताने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 7 सामने जिंकले पण त्यापेक्षा बेस्ट दक्षिण आफ्रिकेनं केलेला ऑस्ट्रेलियाचा पराभव होता.

मांजरेकरांच्या या ट्विटनंतर चाहते भडकले असून त्यांच्या या ट्विटला ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांनी याआधीही बीसीसीआय आणि स्टार स्पोर्ट्सला संजय मांजरेकर यांना समालोचक म्हणून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून संजय मांजरेकर स्वत:च्या वक्तव्यामुळे अडचणीत येत आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांवर चाहत्यांनी टीका केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांनी मांजरेकरांना समालोचन करण्यापासून हटवण्याची मागणी केली होती.

केवळ जडेजाच नाही तर महेंद्र सिंग धोनीवर देखील केलेल्या वक्तव्यावर अनेक युझर्स नाराज आहेत. धोनीच्या विरुद्ध बोलल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

संजय मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना जडेजाने ट्विटवर लिहले होतं की, "मी तुमच्या पेक्षा दुप्पट सामने खेळले आहेत आणि अजून देखील खेळत आहे. दुसऱ्या व्यक्तीने जे कमवले आहे त्याचा आदर करायला शिका. मी तुमची फालतू बडबड खुप ऐकूण घेतली आहे."

World Cup : पाकला बाहेर काढण्यासाठी भारत हरला का? सर्फराजनं दिलं उत्तर

11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

SPECIAL REPORT : दिल्लीनंतर थेट शेती, नवनीत राणांची अशीही बांधिलकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 06:40 AM IST

ताज्या बातम्या