काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात; तर भाजपकडून 2024 तयारी सुरू!

काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात; तर भाजपकडून 2024 तयारी सुरू!

एका बाजूला देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेस नेतृत्व संकटात सापडला असताना दुसऱ्या बाजूला भाजप 2024 निवडणुकीची तयारी करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सदस्यता अभियान सुरु केले आहे. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आणि त्यानंतर सरकार स्थापन, मंत्रिमंडळाची निर्मिती झाल्यानंतर आता मोदी-शहा जोडीने पक्ष संघटनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेस नेतृत्व संकटात सापडला असताना दुसऱ्या बाजूला भाजप 2024 निवडणुकीची तयारी करत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप 5 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. पण भाजपने त्याची तयारी आताच सुरु केली आहे. 2024साठी भाजपने दक्षिण भारतावर लक्ष्य केंद्रीत करण्याचे ठरवले आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदींनी वाराणसी येथे तर अध्यक्ष अमित शहा यांनी तेलंगणामध्ये सदस्यता अभियान सुरु केले. 2014च्या तुलनेत 2019मध्ये भाजपने आणखी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे केंद्रात स्वबळावर असलेल्या भाजपने आता थेट 2024ची तयारी सुरु केली आहे. उत्तर भारत, मध्य भारत आणि इशान्येकडील राज्यात पक्षाने दमदार कामगिरी केली आहे. पश्चिम बंगाल सारख्या राज्यात देखील भाजपने यंदा चांगले यश मिळवले आहे. असे असले तरी दक्षिणेकडील राज्यातून त्यांना फार जागा मिळालेल्या नाहीत. कर्नाटकचा अपवाद वगळता तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यात लोकसभात भाजपला यश मिळालेले नाही. त्यामुळेच आता पक्षाने दक्षिणेकडे मोर्चा वळवला आहे. संघटनेच्या आधारावर पक्षाचा विस्तार होत आहे. जर पक्ष धीम्या गतीने वाढत असला तरी तो मजबूत होत असल्याचे अमित शहा यांनी सदस्यता अभियान सुरु करताना सांगितले.

जाणून घेऊयात दक्षिणेकडील राज्यात भाजपची काय परिस्थिती आहे...

कर्नाटक- शनिवारीच कर्नाटकमधील 13 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यातील काँग्रेस-जदयू सरकार अडचणीत आले आहे. राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी 113 आमदारांची गजर आहे आणि काँग्रेस-जदयूकडे 116 आमदार आहेत. जर 13 आमदारांचे राजीनामा मंजूर झाले तर भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते.

केरळ- भाजपसाठी दक्षिणेकडील सर्वात आव्हानात्मक राज्य केरळ आहे. भाजपने येथील पक्ष संघटना मजबूत केली आहे. पण त्यांना अद्याप अपेक्षित यश मिळाले नाही. पश्चिम बंगाल प्रमाणे केरळमध्ये देखली पक्षाला यश मिळवायचे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळकडे मोर्चा वळवला आहे. 2019मध्ये भाजपला राज्यातील 20 पैकी एकही जागा मिळाली नाही. पण निवडणुका होताच मोदींनी सर्वात प्रथम केरळला भेट दिली.

आंध्र प्रदेश- राज्यात सध्या जगन मोहन रेड्डी यांचे पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभेत चंद्रबाबू नायडू यांचा पराभव करत रेड्डी यांनी सत्ता स्थापन केली. नायडू यांच्या टीडीपीचे राज्यसभेतील 4 खासदारांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. विधानसभेत नायडू यांना केवळ 23 जागा मिळाल्या आहेत. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यासाठी भाजप पक्ष संघटना मजबूत करत आहे. राज्यातील काही नेत्यांच्या मते एका दिवशी अचानक भाजप विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष होईल.

तेलंगणा- 23 मे रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार लोकसभेच्या 17 पैकी 4 जागांवर भाजपला यश मिळाले आहे. दक्षिणेतील अन्य राज्याबरोबरच भाजपने तेलंगणामध्ये देखील जोर लावला आहे.

तामिळनाडू- जयललिता आणि एम.करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत भाजपला मोठी संधी असल्याचे मानले जात आहे. येथील स्थानिक नेत्यांच्या जोरावर भाजप राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

हॉलीवुड सिनेमा पाहून कोटक महिंद्रा बँकेमध्ये दरोडा, चोरट्यांचा राडा CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 07:30 AM IST

ताज्या बातम्या