मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business Ideas: नोकरीची चिंता सोडा! अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई

Business Ideas: नोकरीची चिंता सोडा! अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई

Business Ideas: नोकरीची चिंता सोडा! अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई

Business Ideas: नोकरीची चिंता सोडा! अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई

Business Ideas: देशात असे बरेच लोक आहेत ज्यांना नोकरी सोडून नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका खास व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 27 सप्टेंबर: अलीकडच्या काळात नोकऱ्या मिळणं खूप कठीण झालं आहे. ज्या नोकऱ्या मिळत आहेत त्यापण किती दिवस टिकतील याची शाश्वती नाही. काही नोकऱ्यांमध्ये कमाई आणि सुरक्षितता नक्कीच आहे, परंतु याद्वारे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. देशात असे बरेच लोक आहेत ज्यांना नोकरी सोडून नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका खास व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय म्हणजे केळीची लागवड करणे. केळी लागवडीतून भरपूर उत्पन्न मिळते. देशभरात असे अनेक लोक आहेत जे केळीची लागवड करून दर महिन्याला चांगली कमाई करत आहेत. केळीची लागवड करून दरमहा लाखो रुपयांचा नफा कमावता येतो. मात्र, हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया -

  •  केळीची एकदा लागवड केली की पूर्ण 5 वर्षे फळ देते हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल. अशा स्थितीत कमी खर्चात केळीची लागवड करून भरपूर नफा मिळतो.

हेही वाचा: OMG! 'या' शेअरने 24 वर्षांमध्ये दिला तब्बल 3681 पट परतावा

  • केळीची शेती सुरू करायची असेल तर यासाठी आपल्याला खूप कमी पैसे खर्च करावे लागतील. काही अहवालांनुसार, जर तुम्ही एक एकर जमिनीवर केळीची लागवड केली तर तुम्हाला सुमारे 50 हजार रुपये खर्च येईल. दुसरीकडे, केळी लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू करायची असल्यास या प्रकरणात तुमची किंमत जास्त असेल.
  •  केळीच्या शेतीत तुमचा दीड ते दोन लाख रुपयांचा नफा अगदी सहज होतो. केळीच्या रोपाला लावणीनंतर फळे येण्यास सुमारे 12 ते 13 महिने लागतात. त्यानंतर ते फळ देतं.

  •  देशभरातील अनेक शेतकरी केळीची लागवड करून भरपूर कमाई करत आहेत. केळी उत्पादनात भारत हा अग्रेसर देश आहे. भारत जगातील 25 टक्के केळी उत्पादन करतो.

First published:

Tags: Business, Business News