Home /News /money /

Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण?

Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण?

नवीन काळातील तंत्रज्ञान शेअर्ससाठी आजही अतिशय वाईट सुरुवात होती. Zomato आणि Paytm सारख्या शेअर्सवर सतत दबाव आहे. आजच्या ट्रेडदरम्यान, दोन्ही शेअर लिस्टिंग नंतरच्या आजवरच्या नीच्चांकी पातळीवर ट्रेड करत आहेत.

    मुंबई, 24 जानेवारी : शेअर बाजारात (Share Market Update) आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज 24 जानेवारीलाही पडझड सुरुच आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेली घसरण आजही कायम आहे. अनेक मोठ्या शेअर्समध्ये गुंतवणूकारांचे (Investors) लाखो कोटींचं नुकसान झालं. नवीन काळातील तंत्रज्ञान शेअर्ससाठी (Tech Shares) आजही अतिशय वाईट सुरुवात होती. Zomato आणि Paytm सारख्या शेअर्सवर सतत दबाव आहे. आजच्या ट्रेडदरम्यान, दोन्ही शेअर लिस्टिंग नंतरच्या आजवरच्या नीच्चांकी पातळीवर ट्रेड करत आहेत. आज 24 जानेवारीच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्ये Zomato चे शेअर 18 टक्क्यापर्यंत घसरले होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास झोमॅटोचे शेअर्स 18.61 टक्के खाली येत 92.35 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे शेअर्स 25 टक्क्यापेक्षा जास्त घसरले आहेत. दुसरीकडे, 24 जानेवारी रोजी Paytm चे शेअर्स 4 टक्के कमी होऊन 924 रुपयांवर ट्रेड करत आहेत. PM Shram Yogi MaanDhan Yojana: मजुरांना मिळणार 3000 रुपये पेन्शन, कुठे आणि कसा फॉर्म भरायचा? फूड डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म Zomato जुलै 2021 मध्ये लिस्ट झाली. कंपनीची इश्यू किंमत 76 रुपये होती आणि सध्या ती इश्यू किंमतीपेक्षा 30 टक्के जास्त आहे. त्याच वेळी, पेटीएमची इश्यू किंमत 2150 रुपये होती आणि त्याचे शेअर्स 924 रुपयांवर ट्रेडिंग करत आहेत, इश्यू किमतीपेक्षा 57 टक्के खाली आहे. कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स मिंटनुसार, जिओजीस फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इनवेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार म्हणाले की, जागतिक बाजारातील कल खूपच कमकुवत आहे. गेल्या आठवड्यात S&P त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 8 टक्के आणि Nasdaq 15 टक्क्यांवर बंद झाला. मागील आठवड्यात टेक शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. युरोपियन बाजारातही शेअर्सची घसरण सुरूच आहे. विजयकुमार म्हणाले की, टेक स्टॉक्सच्या विक्रीचा एक विशेष कल दिसून येत आहे की मोठ्या संख्येने गुंतवणूकदार नॉन प्रॉफिटेबल टेक स्टॉकमधून बाहेर पडत आहेत. या ट्रेंडचा परिणाम भारतातील Zomato आणि Paytm सारख्या शेअर्सवर दिसून येत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या