मुंबई, 24 जानेवारी : देशातील गरीब कामगार वर्गाला सक्षम करण्यासाठी सरकार सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते. पीएम किसान योजनेप्रमाणेच (PM Kisan Yojna) सरकारने मजुरांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Sharm Yogi MaaDhan Yojna) सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत मजूर, वीटभट्टी किंवा बांधकामावर काम करणारे कामगार, पादत्राणे बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धुलाई, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार अशा इतर मजुरांना पेन्शन दिली जाते. यासोबतच त्या मजुरांचाही यात समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी कामगार
केंद्र सरकारच्या या योजनेशी (Government Scheme) संबंधित व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते. दरम्यान, लाभार्थीचा मृत्यू झाल्यास निवृत्ती वेतनाच्या 50 टक्के रक्कम पती-पत्नीला पेन्शन म्हणून दिली जाते.
कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. एका अंदाजानुसार देशात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी कामगार आहेत. या योजनेतील अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. त्यांना 60 वर्षापर्यंत दरमहा 55 ते 200 रुपये द्यावे लागतील. त्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असावे. वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन सुरू होईल.
कोण अर्ज करू शकत नाहीत
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करणारे लोक संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी नसावेत. यासोबतच, कोणीही EPFO, NPS आणि ESIC चा सदस्य नसावा आणि करदाता नसावा.
Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट www.maandhan.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Proceed वर क्लिक करा. नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. OTP वेरिफाय करा. त्यानंतर अॅप्लिकेशन पेज ओपन होईल. विचारलेली माहिती एंटर करा आणि सबमिट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.