Home /News /money /

कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स

कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स

अशी मिळवा कर्जापासून मुक्तता

अशी मिळवा कर्जापासून मुक्तता

अनेक वेळा जुने कर्ज फेडण्यासाठी लोक नवीन कर्ज घेतात आणि कर्जाच्या सापळ्यात अडकत जातात. मात्र कर्जातून बाहेर पडणे देखील खूप सोपे आहे. फक्त आर्थिक संकटाच्या वेळी, संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे.

    मुंबई, 23 डिसेंबर : प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आर्थिक संकट (Financial Crises) येतातच. आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये म्हणून माणूस सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन (Financial Planning) करत असला तरी एक वेळ अशी येते की त्याला त्याच्या नातेवाईक किंवा बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. परंतु कर्ज फेडणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अनेक वेळा जुने कर्ज फेडण्यासाठी लोक नवीन कर्ज (Loan) घेतात आणि कर्जाच्या सापळ्यात अडकत जातात. मात्र कर्जातून बाहेर पडणे देखील खूप सोपे आहे. फक्त आर्थिक संकटाच्या वेळी, संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. येथे आम्ही अशाच काही टिप्सची चर्चा करत आहोत, ज्याचा अवलंब करून आर्थिक संकटात सहजपणे कर्जमुक्ती (Debt Free) मिळवता येते. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी बचत वाढवणे आवश्यक कोरोना महामारीमुळे (Coronavirus) आपल्याला कुटुंब आणि बचतीचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजले आहे. अडचणीच्या वेळी फक्त तुमचे कुटुंब आणि जोडलेले पैसे उपयोगी पडतात. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. त्यामुळे बचतीवर भर देण्याची गरज आहे. पगार आल्यावर आधी बचतीचा काही भाग काढून घ्या, मग उरलेला पगार घरखर्चासाठी वापरा. खर्चावर नियंत्रण ठेवून बचत करण्यावर भर द्या. कर्ज टाळा आज बाजारात अनेक बँका आणि वित्तीय संस्था खुल्या हाताने कर्ज वाटप करत आहेत. क्रेडिट कार्ड आणि लोनसाठी रोज कॉल्स जवळजवळ प्रत्येकाला येतात जे कोणत्याही सबबीशिवाय कर्ज घेण्यास सांगतात. आपल्या आजूबाजूला कर्जदारांनी असा एक आकर्षक सापळा रचला आहे, जो प्रत्येकाला त्यांच्याकडे आकर्षित करतो. हे आकर्षण आपण टाळले पाहिजे. कर्ज घ्यावे लागले तरी खाजगी संस्थेकडून कर्ज घेऊ नका. नामांकित बँकेकडूनच कर्ज घ्या. क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर प्रथम कर्ज फेडा तुमच्याकडे आधीच कर्ज असेल तर ते आधी फेडून टाका. लहान कर्जाची एकरकमी परतफेड करावी आणि जर तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर आधी ते परत करण्याचा प्रयत्न करा ज्यावर जास्त व्याज दिले जात आहे. जर तुम्ही जास्त मेहनत करून वेगळी काही कमाई करत असाल तर ते पैसे कर्ज फेडण्यासाठी वापरा.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Financial debt, Loan

    पुढील बातम्या