जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market Update: शेअर बाजारात जबरदस्त उसळी, सेन्सेक्स 1736 अंकांनी वधारला तर निफ्टी 17352 अंकांवर

Share Market Update: शेअर बाजारात जबरदस्त उसळी, सेन्सेक्स 1736 अंकांनी वधारला तर निफ्टी 17352 अंकांवर

Share Market Update: शेअर बाजारात जबरदस्त उसळी, सेन्सेक्स 1736 अंकांनी वधारला तर निफ्टी 17352 अंकांवर

शेअर बाजारातील बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स 1736.21 अंकांनी किंवा 3.08 टक्क्यांनी वाढून 58142.05 अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टी 509.70 अंकांनी किंवा 3.03 टक्क्यांनी वाढून 17352.50 अंकांवर पोहोचला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी : शेअर बाजारात काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर गुंतवणूकदार मोठ्या चिंतेत होते. मात्र आज शेअर बाजारात आज तेवढ्यात ताकदीने रिकव्हरी दिसली. शेअर बाजारातील बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स 1736.21 अंकांनी किंवा 3.08 टक्क्यांनी वाढून 58142.05 अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टी 509.70 अंकांनी किंवा 3.03 टक्क्यांनी वाढून 17352.50 अंकांवर पोहोचला आहे. टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, बजाज फायनान्स, श्री सिमेंट्स आणि हीरो मोटोकॉर्प हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले, तर सिप्ला आणि ओएनजीसी शेअरचे सर्वाधिक नुकसान झाले. ऑटो, बँक, रियल्टी, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, आयटी आणि एफएमसीजी इंडेक्स 2-3 टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्सचे सर्व शेअर्स वधारले आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी सर्व शेअर वाढीसह बंद झाले. Bajaj Finance, Bajaj Finserv, LT, Titan, Wipro, Asian Paint, Kotak Bank, Mahindra & Mahindra, Tech Mahindra, Bharti Airtel, Reliance, INFY, IndusInd Bank, Maruti, HDFC Bank, IndusInd Bank इत्यादी सर्व वधारले. Paytm च्या शेअर नीच्चांकी पातळीवर, विजय शेखर शर्मांच्या संपत्तीत मोठी घट टॉप गेनर शेअर्स » टाटा मोटर्स (Tata Motors)- 504.00 रुपये (6.90 टक्के) » आयशर मोटर्स (Eicher Motors) - 2,724 रुपये (5.96 टक्के) » श्री सिमेंट (Shree Cements) - 24,909.20 रुपये (5.60 टक्के) » बजाज फायनान्स (Bajaj Finance)- 7,142.05 रुपे (5.25 टक्के) » हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) 2,778.65 रुपये (4.91 टक्के) LIC IPO : तुम्हीही एलआयसी आयपीओची वाट पाहताय? काय असेल इश्यू प्राईज? वाचा डिटेल्स टॉप लूजर्स » सिप्ला (Cipla) - 921.85 रुपये (3.46 टक्के) » ओेएनजीसी (ONGC)- 164.15 रुपये (1.23 टक्के) Zomato च्या शेअरमध्ये मोठी घसरण आज BSE मध्ये झोमॅटोचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 6 टक्क्यांनी घसरून 75 रुपये प्रति शेअर झाले. या स्टॉकची IPO इश्यू किंमत 76 रुपये होती. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा स्टॉक सुमारे 18 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, हा स्टॉक सुमारे 1 महिन्यात 41 टक्क्यांनी घसरला आहे. जगभरातील टेक शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम या शेअरवर दिसून आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात