मुंबई, 29 जुलै : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदार चिंतेत होते. मात्र आता शेअर बाजाराने ट्रेंड बदलल्याचं चित्र दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजाराने सर्व अंदाज मागे टाकून स्थिर वाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे. शुक्रवारी सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली आणि जवळपास दोन महिन्यांनंतर पुन्हा 57 हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टीनेही आज 17 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्स सकाळी 400 अंकांच्या वाढीसह 57,258 वर उघडला आणि व्यवहाराला सुरुवात केली, तर निफ्टी 150 अंकांनी वाढून 17,080 वर उघडला आणि व्यवहाराला सुरुवात केली. गुंतवणूकदारांनी आज सुरुवातीपासूनच खरेदीचा कल कायम ठेवला आणि सततच्या गुंतवणुकीमुळे सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 557 अंकांनी वधारून 57,411 वर पोहोचला. तर निफ्टी 173 अंकांनी वधारून 17,104 वर ट्रेड करत होता. सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात गुड न्यूज मिळणार? केंद्राकडून तीन गिफ्ट मिळण्याची शक्यता या शेअर्समध्ये उसळी टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, विप्रो, नेस्ले, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ आणि आयशर मोटर्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली. सततच्या खरेदीमुळे हे शेअर 2 टक्क्यांपर्यंत वाढले आणि त्यांनी टॉप गेनर्सच्या यादीत प्रवेश केला. Income Tax: आयटीआर भरण्यास उशीर झाल्यास किती दंड होणार? आणखीही बरंच नुकसान होण्याची शक्यता दुसरीकडे, डॉ. रेड्डीज आणि सन फार्मा सारख्या शेअर्सवर आज दबाव आहे आणि सततच्या विक्रीमुळे ते 4 टक्क्यांनी घसरले आहेत. याशिवाय सिप्लाच्या शेअरमध्येही 1 टक्क्याxची घसरण दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप देखील आज तेजीत आहेत आणि येथे 0.9 टक्के वाढ दिसून येत आहे. आज निफ्टी ऑटो, आयटी आणि मेटल सेक्टर बाजारात आघाडीवर आहेत. हे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक वाढ दाखवत आहेत. आज रियल्टी इंडेक्स मध्येही मोठी उसळी पाहायला मिळत आहे, तर फार्मा शेअर्सवर दबाव आहे आणि हा निर्देशांक 0.9 टक्क्यांच्या घसरणीने ट्रेड करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.