जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात गुड न्यूज मिळणार? केंद्राकडून तीन गिफ्ट मिळण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात गुड न्यूज मिळणार? केंद्राकडून तीन गिफ्ट मिळण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात गुड न्यूज मिळणार? केंद्राकडून तीन गिफ्ट मिळण्याची शक्यता

सतत वाढत चाललेल्या महागाईच्या काळात सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. जर सरकारने डीए वाढवला तर 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जुलै : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात तीन भेट मिळू शकतात. पगारवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना गुड न्यूज मिळू आहेत. सरकार पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याबाबत विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच पीएफवर मिळणारे व्याजही सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकू शकते. थकित डीए मिळण्याची शक्यता सरकार पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांचा थकित डीए देऊ शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती आलेले नाही. सरकारी कर्मचाऱ्यांकडे जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत एकूण 18 महिन्यांची DA थकबाकी आहे. आज तकच्या बातमीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकावेळी दीड ते दोन लाख रुपयांची थकबाकी डीए मिळू शकते. कर्मचार्‍यांकडून त्यांच्या थकित डीएची मागणी सातत्याने केली जात आहे. Income Tax: आयटीआर भरण्यास उशीर झाल्यास किती दंड होणार? आणखीही बरंच नुकसान होण्याची शक्यता डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वाढती महागाई पाहता आता सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये किमान 4 ते 5 टक्के वाढ करणार असल्याचे बोलले जात आहे. जून महिन्यातही किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या वर होता, जो रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करू शकते, अशी अपेक्षा आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने डीए मिळत आहे. सरकारने यावर्षी मार्चमध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती. सतत वाढत चाललेल्या महागाईच्या काळात सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. जर सरकारने डीए वाढवला तर 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळेल. Warren Buffett Tips: हे काम नक्की करा, वॉरेन बफेंनी दिला श्रीमंतीचा गुरूमंत्र पीएफचे व्याज मिळू शकते 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPF वर 8.01 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते. सरकार जुलैमध्ये पीएफच्या व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकू शकेल अशी अपेक्षा आहे. पगारदार लोकांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते. तुम्ही UMANG अॅप, EPFO ​​सदस्य ई-सेवा पोर्टल, एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे तुमची ठेव रक्कम देखील तपासू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात