जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Income Tax: आयटीआर भरण्यास उशीर झाल्यास किती दंड होणार? आणखीही बरंच नुकसान होण्याची शक्यता

Income Tax: आयटीआर भरण्यास उशीर झाल्यास किती दंड होणार? आणखीही बरंच नुकसान होण्याची शक्यता

Income Tax: आयटीआर भरण्यास उशीर झाल्यास किती दंड होणार? आणखीही बरंच नुकसान होण्याची शक्यता

ITR Filing : अंतिम मुदतीपर्यंत प्राप्तीकर न भरल्यास थकित रकमेवर एक टक्का व्याज द्यावं लागेल. कराची रक्कम चुकीची असल्यासदेखील नियमांनुसार करदात्याला 31 जुलैपासून व्याजासह थकित कर भरावा लागणार आहे.

    मुंबई, 28 जुलै : 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी आयटीआर (ITR for Assessment year 2022-23) म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आता जवळ आली आहे. 31 जुलै (ITR Deadline) 22 ही आयटीआर फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तीकर विभाग आणि सीबीडीटीने (CBDT) ही मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 31 तारखेनंतर जर कोणी आयटीआर भरत असेल, तर त्याला दंड (Fine on late ITR) होणार आहे. प्राप्तीकर विभाग (Income Tax department) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन वारंवार लोकांना आयटीआर भरण्याबाबत आठवण करून देत आहे. या वर्षी आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नसल्याचंही विभागाने स्पष्ट केलं आहे. सोबतच करदात्यांना वारंवार टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातूनही डेडलाईनची (ITR due date) आठवण करून दिली जात आहे. “26 जुलै 2022 पर्यंत 3.4 कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत. यापैकी 30 लाखांहून अधिक अर्ज 26 जुलै या एका दिवसात दाखल झाले आहेत. 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. आतापर्यंत भरला नसेल, तर आत्ताच भरा, आणि लेट फी (ITR late fees) टाळा.” अशा आशयाचे ट्वीट प्राप्तीकर विभागाने 27 जुलै रोजी केले होते. डेडलाईन मिस झाल्यास काय होईल? लेट फी 31 जुलैपर्यंत जे करदाते आयटीआर भरू शकणार नाहीत, त्यांना पुढे 31 डिसेंबरपर्यंत बीलेटेड रिटर्न्स भरता येणार आहेत. मात्र, यासाठी त्यांच्याकडून लेट फी आकारली जाईल. आयटीआर उशीरा भरल्यास प्राप्तीकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत शुल्क आकारले जाते. जेवढा जास्त विलंब होईल, त्या प्रमाणात लेट फी (ITR Late fee after 31st July) लागू होते. नोटांचे ढीग, 3 किलो सोनं; ईडीच्या कारवाईत अर्पित मुखर्जींच्या घरात डोळे पांढरे करणारी संपत्ती जप्त कलम 234F नुसार, पाच लाख रुपये आणि त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांनी 31 जुलैनंतर आयटीआर दाखल केल्यास त्यांना पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच, पाच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे. ज्यांना प्राप्तीकर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. न भरलेल्या करावर व्याज अंतिम मुदतीपर्यंत प्राप्तीकर न भरल्यास थकित रकमेवर एक टक्का व्याज द्यावं लागेल. कराची रक्कम चुकीची असल्यासदेखील नियमांनुसार करदात्याला 31 जुलैपासून व्याजासह थकित कर भरावा लागणार आहे. तसंच, एखाद्या महिन्याच्या पाच तारखेनंतर जर ही रक्कम भरली, तर त्या संपूर्ण महिन्याचं व्याजही करदात्याला भरावं लागेल. आजारपणाची करू नका चिंता! सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळतात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, असा करा अर्ज नुकसान कॅरीफॉरवर्ड करण्याचा पर्याय जाणार करदात्याने जर आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत चुकवली, तर इतर फायदेही गमावले जातील. यामध्ये कॅपिटल गेन्स किंवा बिझनेस ऑपरेशन्स या पर्यायांतर्गत झालेल्या नुकसानाची भरपाई समाविष्ट आहे. जर आयटीआर नियोजित तारखेच्या आत दाखल केला असेल, तर सरकार ते नुकसान पुढील वर्षांपर्यंत कॅरीफॉरवर्ड करण्याची परवानगी देतं. त्यामुळे दंड आणि इतर नुकसान टाळायचे असल्यास 31 जुलै 2022 पूर्वी आयटीआर दाखल करणं गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात