मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex मध्ये 889 अंकांची पडझड, तर Nifty 17 हजारांच्या खाली

शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex मध्ये 889 अंकांची पडझड, तर Nifty 17 हजारांच्या खाली

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 889.40 अंकांनी म्हणजेच 1.54 टक्क्यांनी घसरून 57,011.74 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 263.20 अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरून 16985.20 वर बंद झाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 डिसेंबर : शेअर बाजारात सध्या मोठा डाऊन ट्रेंड सुरु आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली. शेअर बाजार व्यवहाराच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 889.40 अंकांनी म्हणजेच 1.54 टक्क्यांनी घसरून 57,011.74 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 263.20 अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरून 16985.20 वर बंद झाला.

शुक्रवारच्या व्यवहारात IndusInd Bank, Tata Motors, ONGC, Kotak Mahindra Bank आणि HUL निफ्टीचे टॉप लूजर ठरले आहेत. तर Wipro, Infosys, HCL Technologies, Power Grid Corporation आणि Sun Pharma टॉप गेनर राहिले.

एकीकडे शेअर बाजारात पडझड होत असताना IT इंडेक्स तेजीत दिसत होता. TCS, Wipro, Infosys, HCL Technology, Birlasoft या शेअरमध्ये आज वाढ झाली.

एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का?

फ्लिपकार्ट IPO लाँच करण्याच्या तयारीत

WallMart च्या मालकीची फ्लिपकार्ट (Flipkart) आपला बहुप्रतिक्षित IPO पुढील वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आणू शकतो. हा IPO भारतात लिस्ट होणार नसून तो परदेशी स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होऊ शकतो. फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे.

फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री

MTR फूड्स इडली आणि डोसा पिठ विकणार

एमटीआर फूड्स या पॅकेज्ड फूडची विक्री करणाऱ्या कंपनीने आता ताज्या इडली आणि डोसा पिठाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. या खाद्य उत्पादनांची विक्री करण्यासाठी, कंपनीने एमटीआर मिनिट फ्रेश नावाचा एक नवीन ब्रँड लॉन्च केला आहे, जो ग्राहकांना त्याच्या नावानुसार काही मिनिटे आधीच तयार केलेले खाद्यपदार्थ देईल.

First published:

Tags: Investment, Money, Share market