जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market Update : शेअर बाजारात घसरण सुरुच, Sensex 768 अंकांनी तर Nifty 252 अंकांनी खाली

Share Market Update : शेअर बाजारात घसरण सुरुच, Sensex 768 अंकांनी तर Nifty 252 अंकांनी खाली

Share Market Update : शेअर बाजारात घसरण सुरुच, Sensex 768 अंकांनी तर Nifty 252 अंकांनी खाली

बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स 768.87 अंक किंवा 1.40 अंकांच्या घसरणीसह 54333.81 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 252.60 अंक किंवा 1.53 टक्क्यांच्या घसरणीसह 16245.40 अंकांवर बंद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मार्च : रशिया-युक्रेन युद्धामुळे (RUssia Ukrain War) भारतीय शेअर बाजारात (Share Market) सातत्याने घसरण होत आहे. आज देखील शेअर बाजार जवळपास दीड टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 768.87 अंक किंवा 1.40 अंकांच्या घसरणीसह 54333.81 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 252.60 अंक किंवा 1.53 टक्क्यांच्या घसरणीसह 16245.40 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील 1204 शेअर आज वधारले. 2075 शेअर आज घसरले तर 96 शेअर्समध्ये आज कोणतीही हालचाल दिसली नाही. Titan Company, Maruti Suzuki, Asian Paints, Hero MotoCorp आणि Tata Motors हे निफ्टीचे टॉप लूजर्स ठरले. तर Dr Reddy’s Laboratories, ITC, Tech Mahindra, Sun Pharma आणि UltraTech Cement टॉप गेनर शेअर ठरले. आयटी वगळता इतर सर्व निर्देशांक ऑटो, मेटल, एनर्ज, कॅपिटल गुड्स, रियल्टी 2-3 टक्क्यांहून अधिक घसरून लाल रंगात बंद झाले. BSE मिडकॅप इंडेक्स 2.3 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1.6 टक्क्यांनी घसरला. Multibagger Stock : ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकमध्ये खरेदीची संधी, विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओतील शेअर याआधी गुरुवारी, सेन्सेक्स व्यवहाराच्या शेवटी 366.22 अंकांनी किंवा 0.66 टक्क्यांनी घसरून 55,102.68 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 107.90 अंकांनी किंवा 0.65 टक्क्यांनी घसरून 16,498.05 वर बंद झाला होता. NSE ने MD-CEO पदासाठी अर्ज मागवले NSE ने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी 25 मार्चपूर्वी IPO आणण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सध्याचे एमडी आणि सीईओ विक्रम लिमये यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपत आहे. चित्रा रामकृष्ण यांच्या जाण्यानंतर जुलै 2017 मध्ये लिमये यांची नियुक्ती करण्यात आली होती. छप्परफाड कमाई! वर्षभरात गुंतवणूकदारांना 13500 टक्के परतावा, एक लाख बनले एक कोटी संजीव कपूर यांची जेट एअरवेजच्या सीईओपदी नियुक्ती जेट एअरवेजचे नवे प्रमोटर जालान कॅलरॉक कन्सोर्टियमने शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून संजीव कपूर यांची नियुक्ती जाहीर केली. काही दिवसांपूर्वी कंपनीने श्रीलंकन ​​एअरलाइन्सचे माजी सीईओ विपुल गुनाथिलक यांची सीएफओ म्हणून नियुक्ती केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात