मुंबई, 4 मार्च : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना, काही दर्जेदार स्टॉक्स आकर्षक दरात आले आहेत. तेजस नेटवर्क्स (Tejas Networks) हा असाच एक स्टॉक आहे, जो गेल्या एका महिन्यात 12 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक अजूनही भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी (Multibagger Stock) एक आहे. या मल्टीबॅगर टेलिकॉम हार्डवेअर स्टॉकमध्ये अलीकडच्या सेशनमध्ये घसरण दिसून आली आहे आणि शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की, गुंतवणूकदारांनी हा शेअर आता खरेदी करावा. त्यात सध्याच्या पातळीपासून मल्टीबॅगर स्टॉक बनण्याची क्षमता आहे. तज्ज्ञ हा स्टॉक 520 प्रति शेअरच्या टार्गेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. छप्परफाड कमाई! वर्षभरात गुंतवणूकदारांना 13500 टक्के परतावा, एक लाख बनले एक कोटी 390 रुपयांच्या आसपास खरेदीची संधी चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांनी डिप्स स्ट्रॅटेजीवर खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की हा मल्टीबॅगर स्टॉक सध्या 380 ते 450 च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. जर कोणाला हा शेअर विकत घ्यायचा असेल तर तो आता खरेदी करू शकता येईल. ज्यांना एकाच वेळी पोझिशन बनवायची आहे त्यांनी थोडा वेळ थांबावे. 390 किंवा 400 रुपयांच्या पातळीवर आढळल्यास ते एकाच वेळी खरेदी केले जाऊ शकते. सुमित यांनी यासाठी 375 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे. 520 रुपयांचे टार्गेट GCL सिक्युरिटीजचे व्हाईस चेअरमन रवी सिंघल यांनी तेजस नेटवर्क शेअर बद्दल सांगितले की, अल्पकालीन गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये 440-450 रुपयांच्या टार्गेटसह पोझिशन घेऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदार 520 रुपयांच्या टार्गेटसाठी शेअअर खरेदी करू शकतात. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील ‘या’ शेअरमध्ये 48 टक्क्यांची घसरण, तज्ज्ञांचं मत काय? तेजस नेटवर्क शेअर प्राईज हिस्ट्री विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमधील हा स्टॉक 2021 मधील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, परंतु सध्या विक्रीमुळे दबावाखाली आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक सुमारे 12 टक्क्यांनी घसरला आहे. या स्टॉकने 5 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर 570.50 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तेजस नेटवर्क्समध्ये विजय केडिया यांची शेअरहोल्डिंग आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसर्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्नवर आधारित विजय केडिया यांच्याकडे तेजस नेटवर्क्समध्ये 3.42 टक्के हिस्सा आहे. केडिया सिक्युरिटीज लिमिटेडकडे 39 लाख शेअर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.