जाहिरात
मराठी बातम्या / मनी / छप्परफाड कमाई! वर्षभरात गुंतवणूकदारांना 13500 टक्के परतावा, एक लाख बनले एक कोटी

छप्परफाड कमाई! वर्षभरात गुंतवणूकदारांना 13500 टक्के परतावा, एक लाख बनले एक कोटी

छप्परफाड कमाई! वर्षभरात गुंतवणूकदारांना 13500 टक्के परतावा, एक लाख बनले एक कोटी

वर्षभरापूर्वी SEL Manufacturing Company Ltd च्या शेअर्समध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आज 1.3 कोटी रुपये झाली आहे. 2 मार्चच्या तुलनेत या कालावधीत सेन्सेक्स 10.28 टक्क्यांनी वाढला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मार्च : शेअर बाजारात अनेक मल्टीबॅगर शेअर्समधून (Multibagger share) गुंतवणूकदारांना यावर्षीही मोठा परतावा मिळाला आहे. या काळात, बहुसंख्य पेनी स्टॉकचा (What is Penny Stock?) समावेश मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत करण्यात आला आहे. या शेअर्समध्ये विक्रमी तेजी पाहायला मिळाली. आज आम्ही तुम्हाला अशा मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने केवळ 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 13,500 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. (SEL Manufacturing Company Ltd) असे या स्टॉकचे नाव आहे. एका वर्षात 1 रुपयांवरून 186 रुपयांपर्यंत पोहोचला SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स गेल्या एका वर्षात 13516 टक्क्यांनी वाढले आहेत. हा स्टॉक 2 मार्च 2021 रोजी 1.37 वर बंद झाला, जो 2 मार्च 2022 रोजी BSE वर 186.55 रुपयांवर पोहोचला. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील ‘या’ शेअरमध्ये 48 टक्क्यांची घसरण, तज्ज्ञांचं मत काय? 1 लाख 1 कोटींहून अधिक झाले वर्षभरापूर्वी SEL Manufacturing Company Ltd च्या शेअर्समध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आज 1.3 कोटी रुपये झाली आहे. 2 मार्चच्या तुलनेत या कालावधीत सेन्सेक्स 10.28 टक्क्यांनी वाढला. 2 मार्च रोजी हा शेअर 4.98 टक्क्यांनी वाढून 186.55 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी गेल्या सहा दिवसांत स्टॉक 33.92 टक्के वाढला आहे. SEL मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेजपेक्षा जास्त आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून SEL चा उत्पादन हिस्सा 395.48 टक्क्यांनी वाढला आहे. एका महिन्यात स्टॉक 128 टक्के आणि एका आठवड्यात 21.49 टक्के वाढला आहे. BSE वर फर्मचे मार्केट कॅप 618 कोटी रुपये होते. 8 मार्च 2021 रोजी शेअरने 1.14 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. रशिया-युक्रेन युद्धाचा तुमच्या खिशावर परिणाम; गगनाला भिडणार घरगुती गॅसच्या किमती डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत आठ प्रमोटर्सकडे फर्ममध्ये 75.27 टक्के आणि 16,521 सार्वजनिक भागधारकांकडे 24.73 टक्के हिस्सा होता. यापैकी 15,546 सार्वजनिक भागधारकांकडे 0.46 टक्के भांडवल होते, ज्यांचे भांडवल 2 लाख रुपयांपर्यंत होते. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तीन विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) 42,178 शेअर घेतले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात