मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेअर बाजारात सलग दुसऱ्या जोरदार रॅली; सेन्सेक्स 611 अंकांनी तर निफ्टीत 184 अंकांची वाढ

शेअर बाजारात सलग दुसऱ्या जोरदार रॅली; सेन्सेक्स 611 अंकांनी तर निफ्टीत 184 अंकांची वाढ

मुंबई, 22 डिसेंबर : शेअर बाजारात (Share Market) बुधवारी जोरदार रॅली पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) प्रमुख निर्देशांक Sensex 611.55 अंकांच्या किंवा 1.09 टक्क्यांच्या वाढीसह 56,930.56 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा Nifty 184.60 अंकांच्या किंवा 1.10 टक्क्यांच्या वाढीसह 16,955.45 वर बंद झाला.

बुधवारच्या व्यवहारात Hindalco Industries, Tata Motors, Device Laboratories, Bajaj Finance आणि Eicher Motors हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर Power Grid Corporation, SBI Life Insurance, Wipro, Adani Ports आणि IOC हे टॉप लूजर होते.

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम?

एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 56,319.01 च्या पातळीवर बंद

आधी मंगळवारी बीएसई सेन्सेक्सने 497 अंकांची वाढ नोंदवली. 30 प्रमुख शेअरवर आधारित सेन्सेक्स 497 अंकांनी किंवा 0.89 टक्क्यांनी वाढून 56,319.01 वर आणि NSE निफ्टी 156.65 अंकांनी किंवा 0.94 टक्क्यांनी वाढून 16,770.85 वर बंद झाला.

लाख रुपये गुंतवून सुरु करा व्यवसाय; दरमाह होईल बंपर कमाई, सरकारकडूनही मिळते मदत

मेट्रो ब्रँड्स IPO ने गुंतवणूकदारांची निराशा

Rategain Travel Technologies आणि Shriram Properties च्या IPO नंतर, मेट्रो ब्रँड देखील डिस्काऊंटमध्ये लिस्टिंग झाला आहे. या महिन्यात इश्यू किमतीच्या खाली उघडणारा हा तिसरा IPO ठरला आहे. मेट्रो ब्रँड्सने त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा 12.80 टक्के खाली ओपन झाला आहे. मेट्रो ब्रँड्सचे शेअर्स BSE वर 436 रुपयांच्या स्तरावर लिस्टिंग झाले आहेत आणि NSE वर 437 रुपये प्रति शेअर आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market