मुंबई, 22 डिसेंबर : स्वत:चा व्यवसाय असावा ही अनेकांची इच्छा असते. मात्र चांगली आयडिया (Business Idea) आणि आर्थिक पाठबळ यामुळे अनेकजण आपलं व्यावसायिक बनण्याचं स्वप्न पूर्ण करु शकत नाहीत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल सांगत आहोत, जिच्यामुळे तुम्ही छोटा व्यवसाय (Small Business) सुरू करून अधिक नफा कमावू शकता (Earn Money). हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडूनही तुम्हाला मदत मिळते. बिस्किट (Biscuit Making Business) ही अशी एक गोष्ट आहे ज्याला नेहमीच मागणी असते. त्याची मागणी कधीच कमी होत नाही. अशा परिस्थितीत बेकरी उत्पादन (Biscuit Plat) बनवण्यासाठी युनिट उभारणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला बेकरी उद्योग सुरू करायचा असेल तर मोदी सरकार तुम्हाला यासाठी मदत करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Yojna) व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकूण खर्चाच्या 80 टक्क्यांपर्यंत शासनाकडून निधीची मदत मिळणार आहे. त्यासाठी शासनाने स्वतः प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. सरकारने जी बिझनेस स्ट्रक्चरिंग केली आहे त्यानुसार, सर्व खर्च वजा केल्यावर, तुम्हाला दरमहा 50 ते 60 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा होऊ शकतो. किती खर्च येईल? प्रकल्प उभारण्यासाठी एकूण खर्च 5.36 लाख रुपये असू शकतो, यामध्ये तुम्हाला स्वतःहून फक्त १ लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुमची मुद्रा योजनेअंतर्गत निवड झाली असेल, तर तुम्हाला बँकेकडून 2.87 लाख रुपये मुदतीचे कर्ज आणि 1.49 लाख रुपयांचे खेळते भांडवल कर्ज मिळेल. प्रोजेक्टअंतर्गत, तुमची स्वतःची 500 चौरस मीटर जागा असावी. नसेल तर ती भाड्याने घेऊन प्रोजेक्टच्या फाईलसह दाखवावी लागेल. डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम? नफा किती होईल? सरकारने तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार अशा प्रकारे एकूण वार्षिक उत्पादन आणि विक्री 5.36 लाख रुपये अंदाजित करण्यात आली आहे. » 4.26 लाख : संपूर्ण वर्षासाठी उत्पादन खर्च » 20.38 लाख रुपये : वर्षभरात इतके उत्पादन होईल की ते विकल्यास तुम्हाला 20.38 लाख रुपये मिळतील. यामध्ये बेकरी उत्पादनाची विक्री किंमत बाजारात मिळणाऱ्या इतर वस्तूंच्या दराच्या आधारे कमी करून निश्चित करण्यात आली आहे. » 6.12 लाख रुपये : एकूण ऑपरेटिंग नफा » 70 हजार : अॅडमिनिस्ट्रेशन आणि विक्रीवर खर्च » 60 हजार : बँक कर्ज व्याज » 60 हजार : इतर खर्च » निव्वळ नफा : वार्षिक 4.20 लाख रुपये बँकेत कित्येक वर्ष वाट पाहावी लागली असती; ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे 5 दिवसात डबल मुद्रा योजनेत अर्ज करा प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, व्यवसाय पत्ता, शिक्षण, वर्तमान उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे हे तपशील द्यावे लागतील. यामध्ये कोणतीही प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी भरावी लागणार नाही. कर्जाची रक्कम 5 वर्षांत परत केली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.