मुंबई, 22 डिसेंबर : तुम्हीही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नवीन वर्षापासून ऑनलाइन कार्ड पेमेंटचे नियम बदलणार आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डची (Debit-Credit Card) सुरक्षितता लक्षात घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2022 पासून नवीन नियम लागू करणार आहे.
ऑनलाइन पेमेंट (Online Payment) अधिक सुरक्षित करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवेद्वारे संग्रहित ग्राहक डेटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि व्यवहारासाठी एनक्रिप्टेड टोकन वापरण्यास सांगितले आहे.
रोज 100 रुपये गुंतवा अन् बना करोडपती! गुंतवणुकीची सोपी पद्धत बनवेल श्रीमंत
नवीन नियम काय आहेत?
नवीन नियमानुसार, मर्चंड्स त्यांच्या वेबसाइटवर कार्डची माहिती सेव्ह करु शकणार नाहीत. RBI ने देशातील सर्व कंपन्यांना डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सेव्ह केलेली माहिती 1 जानेवारी 2022 पर्यंत काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. कार्डच्या सुरक्षिततेसाठी रिझर्व्ह बँकेने हा नियम केला आहे.
बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मेसेज पाठवले
काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना नवीन नियमांबाबत सतर्क करण्यास सुरुवात केली आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना "1 जानेवारी 2022 पासून ग्राहकांच्या कार्ड सिक्युरिटीसाठी RBI च्या नवीन आदेशानुसार व्यापारी वेबसाइट/अॅपवर तुमचे HDFC बँक कार्ड तपशील डिलिट करण्यास सांगितले आहे. प्रत्येक वेळी पेमेंटसाठी, ग्राहकाला एकतर संपूर्ण कार्ड तपशील एंटर करावा लागेल किंवा टोकनायझेशन प्रणालीचा वापर करावा लागेल.
बँकेत कित्येक वर्ष वाट पाहावी लागली असती; 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे 5 दिवसात डबल!
टोकनायझेशन म्हणजे काय? (What is Tokenization?)
आत्तापर्यंत ग्राहकांना व्यवहाराच्या वेळी 16 अंकी कार्ड क्रमांक, कार्ड एक्सपायरी डेट, CVV आणि OTP टाकावा लागतो. ट्रान्जॅक्शन पिन देखील आवश्यक आहे. आता ही सर्व माहिती द्यावी लागणार नाही. आता कार्डच्या तपशीलासाठी कार्ड नेटवर्कवरून एक कोड प्राप्त होईल, ज्याला टोकन म्हटले जाईल. हे टोकन प्रत्येक कार्डसाठी खास असेल. या टोकनद्वारे कोणतीही माहिती दिली जाणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Rbi, Shopping debit card