मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel price Today: आज पुन्हा इंधन दरात वाढ; मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, तर डिझेल शंभरी पार

Petrol-Diesel price Today: आज पुन्हा इंधन दरात वाढ; मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, तर डिझेल शंभरी पार

पेट्रोल-डिझेल दरात (Petrol diesel price) सतत वाढ सुरू आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज रविवारी 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमत (Petrol-Diesel price Today) वाढवल्या आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेल दरात (Petrol diesel price) सतत वाढ सुरू आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज रविवारी 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमत (Petrol-Diesel price Today) वाढवल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर डिझेल दर 35 पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आला आहे.

IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा भाव 104.14 रुपये आणि डिझेल 92.82 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. तर मुंबईत आज पेट्रोल 110.12 रुपये आणि डिझेलच्या किंमती 100.66 रुपये प्रति लीटर आहेत.

चार महानगरात पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 10 October 2021) -

>> दिल्लीत पेट्रोल 104.14 रुपये आणि डिझेल 92.82 रुपये प्रति लीटर

>> मुंबईत पेट्रोल 110.12 रुपये आणि डिझेल 100.66 रुपये प्रति लीटर

>> चेन्नईत पेट्रोल 101.53 रुपये आणि डिझेल 97.26 रुपये प्रति लीटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल 104.80 रुपये आणि डिझेल 95.93 रुपये प्रति लीटर

आणखी वाढू शकतो पेट्रोल-डिझेल दर -

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल दरात सतत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांत पहिल्यांदा 80 डॉलर प्रति बॅरल जवळपास पोहोचू शकतात. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.

2 कोटी रुपये हवेत? मग जाणून घ्या दरमहा किती रुपयांची करावी लागणार SIP

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike, Petrol price hike