मुंबई, 1 सप्टेंबर: भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने (Indian Post) अनेक छोट्या योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसकडून चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे त्यांना उत्तम परतावाही मिळतो. गुंतवणूक सुरक्षित राहत असल्याने या योजनांमध्ये अनेक जण अगदी विश्वासाने पैसे गुंतवतात. सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Sumangal Rural Postal Life Insurance Scheme) ही त्यापैकी एक आहे. या योजनेकडे गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. योजनेमध्ये दररोज 95 रुपये जमा करून एखादी व्यक्ती 14 लाख रुपये मिळवू शकते. ग्रामीण सुमंगल योजनेत विमा (Policy) घेण्यासाठी वयोमर्यादा ठरवून दिलेली आहे. यात भारतात राहणारी व 19 ते 45 वर्ष वयोगटातील कुठलीही व्यक्ती विमा घेता शकते. ही एक ऐडोवमेंट योजना (Endowment Scheme) आहे. ज्या लोकांना वेळोवेळी पैशाची आवश्यकता भासते त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त मानली गेली आहे. यात विमाधारक जिवंत आहे तोपर्यंत परतावा मिळतो. याचाच अर्थ विमाधारक जितके पैसे गुंतवतो तितके पैसे त्याला पॉलिसीची मुदत संपल्यावर परत मिळतात आणि विम्याचा लाभही (Insurance Cover) मिळत राहतो. मनी बॅकचा मिळतो लाभ- या योजनेमध्ये 10 लाखांपर्यंतचा विमा (Sum Assured) असतो. याचाच अर्थ एखाद्या विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि बोनसची रक्कम मिळते. या विम्याचा कालावधी 15 ते 20 वर्षांचा आहे. 15 वर्षांचा विमा असेल तर एकूण विम्याच्या रकमेतील 20-20 टक्के भाग 6,9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मनी बॅकच्या (Money Back) रुपात मिळतो. उर्वरित 40 टक्के रक्कम बोनससह विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर (After Maturity) मिळते. विम्याचा कालावधी 20 वर्षे असेल तर 8, 12 आणि सोळाव्या वर्षी 20-20 टक्के रक्कम मनी बॅकच्या रुपात मिळते. उर्वरित रक्कम विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दिली जाते. हेही वाचा- Credit Card बिलातील मिनिमम ड्यू अमाऊंटचं गणित समजून घ्या; अन्यथा कर्जाच्या सापळ्यात अडकाल 14 लाखाचा फंड कसा जमा करता येईल- समजा एखाद्या व्यक्तीचं वय 25 वर्ष आहे आणि त्याने सात लाख रुपये भरून 20 वर्षांसाठी विमा घेतला असेल तर, त्याला दररोज 95 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. म्हणजेच महिन्याला 2,850 रुपये, तीन महिन्याचा प्रीमियम 8,850 आणि 6 महिन्यांचा प्रीमियम 17 हजार 100 रुपये देणं क्रमप्राप्त आहे. अशा पद्धतीने गुंतवणूक केली गेली तर विम्याचा कालावधी संपल्यानंतर जवळपास 14 लाख रुपये त्या व्यक्तीला मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.