• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • शेअर बाजारात आठवडाभरात गुंतवणूकदारांचे 4.82 लाख कोटी बुडाले; आजही बाजारात घसरण

शेअर बाजारात आठवडाभरात गुंतवणूकदारांचे 4.82 लाख कोटी बुडाले; आजही बाजारात घसरण

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर हिरव्या, तर 19 शेअर लाल रंगात बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट(Ultratech Cement), डॉ. रेड्डी (Dr Reddy) आणि मारुती (MAruti) या कंपन्यांचे शेअर्स आज सर्वाधिक वाढले.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर : शेअर बाजारात (Share Market) आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) 677 अंकांनी किंवा 1.13 टक्क्यांनी घसरुन 59306 अंकावर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 185 अंकांच्या किंवा 1.04 टक्क्यांच्या घसरणीसह 17671 वर बंद झाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज 259.57 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. साप्ताहिक आधारावर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.82 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 264.39 लाख कोटी रुपये होते. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर हिरव्या, तर 19 शेअर लाल रंगात बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट(Ultratech Cement), डॉ. रेड्डी (Dr Reddy) आणि मारुती (MAruti) या कंपन्यांचे शेअर्स आज सर्वाधिक वाढले. त्यांचे शेअर्स 2.60 टक्क्यांपर्यंत वाढले. दुसरीकडे टेक महिंद्रा (TEch Mahindra), एनटीपीसी (NTPC), इंडसइंड बँक (Indusind Bank) आणि कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) शेअर सर्वाधिक घसरले. आजच्या घसरणीत निफ्टी आयटी, प्रायव्हेट बँक इंडेक्सचा सर्वाधिक वाटा आहे. याशिवाय निफ्टी बँक आणि वित्तीय शेअर्सही घसरले. New IPO : पुढील महिन्यात आणखी एका मोठ्या कंपनीचा IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
  बाजाराच्या टेक्निकल इंडिकेटर्सबाबत, LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे सांगतात की, 17500-600 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे. या पातळीवर जोरदार खरेदी दिसून आली. अशा स्थितीत निप्टी 17672 वर किंचित सुधारणा करून पुन्हा वर येण्याची शक्यता आहे. Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकमध्ये आज 10 टक्के वाढ, खरेदीबाबत तज्ज्ञांचं मत काय? नॅचरल गॅसमधील घसरण सुरुच नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) दरात सलग दुसऱ्या दिवशीही घसरण सुरूच आहे. अमेरिकेत किंमती सुमारे 7% च्या दबावाखाली आहेत. यूएसमध्ये किंमत 5.7 डॉलर प्रति mmbtu खाली आली आहे. युरोपमध्येही किमतीवर खूप दबाव आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: