जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market: शेअर बाजार आज घसरणार की वधारणार? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे, गुंतवणुकीआधी वाचा

Share Market: शेअर बाजार आज घसरणार की वधारणार? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे, गुंतवणुकीआधी वाचा

Share Market: शेअर बाजार आज घसरणार की वधारणार? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे, गुंतवणुकीआधी वाचा

Share Market Pre- Open: आरबीआयच्या निर्णयांमुळे बाजारातील वाढ आज संपुष्टात येऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक बाजारातील अनेक घटकांचा परिणाम देशी-विदेशी गुंतवणूकदारांच्या सेन्टिमेंट्सवर दिसून येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल : भारतीय शेअर बाजार (Share MArket Update) सोमवारी पुन्हा जागतिक बाजाराच्या दबावाखाली दिसत असून सुरुवातीच्या व्यवहारापासून घसरणीची चिन्हे दिसत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बाजार गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मिळवलेला नफा गमावू शकतो. शुक्रवारी सेन्सेक्स (Sensex) 59,447 वर बंद झाला, गेल्या आठवड्यात 400 हून अधिक अंकांनी शेअर बाजार वधारला, तर निफ्टी (Nifty) 145 अंकांनी चढून 17,784 वर पोहोचला. ही वाढ सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आली, जेव्हा रिझर्व्ह बँकेने आपले धोरणात्मक (RBI Policy) निर्णय सार्वजनिक केले. आरबीआयच्या निर्णयांमुळे बाजारातील वाढ आज संपुष्टात येऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक बाजारातील अनेक घटकांचा परिणाम देशी-विदेशी गुंतवणूकदारांच्या सेन्टिमेंट्सवर दिसून येईल. यूएस बाजाराची परिस्थिती अमेरिकेतील वाढती महागाई रोखण्यासाठी फेड रिझर्व्हने अनेक व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत, ज्याचा परिणाम तेथील शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. डाऊ जोन्समध्ये (Dow Jones) 0.4 टक्के वाढ दिसून आली परंतु इतर दोन एक्सचेंजमध्ये घसरण झाली. S&P 500 0.27 टक्क्यांनी आणि Nasdaq Composite 1.34 टक्क्यांनी घसरून बंद झाले. Multibagger Stock: ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, दोन वर्षात एक लाख बनले 18.25 लाख युरोपीय बाजारांत तेजी अमेरिकेच्या तिन्ही शेअर बाजारात संमिश्र कल दिसून येत असला तरी युरोपीय बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते. जर्मनीच्या शेअर बाजाराने 1.46 टक्के आणि फ्रान्सच्या शेअर बाजाराने 1.34 टक्क्यांनी उसळी घेतली. त्याचप्रमाणे लंडन स्टॉक एक्सचेंजही 1.56 टक्क्यांच्या मोठ्या उसळीसह बंद झाला. आशियाई बाजारातही घसरण सोमवारी सकाळी आशिया खंडातील सर्वच बाजारात घसरणीचे वातावरण आहे. सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये आज सकाळच्या व्यवहारात 0.30 टक्क्यांची घसरण झाली. जपानचा निक्कीही 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. एवढेच नाही तर हाँगकाँगच्या बाजारात 1.85 टक्के आणि तैवानमध्ये 0.31 टक्के घसरण झाली आहे. दक्षिण कोरियाच्या कोस्पी स्टॉक एक्सचेंजमध्ये 0.30 टक्के आणि चीनच्या शांघाय कंपोझिटमध्ये 1.20 टक्क्यांची घसरण होत आहे. Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील किमती विदेशी गुंतवणूकदारांच्या वाढत्या खरेदीपेक्षाही वेगवान नाही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सुमारे सहा महिन्यांनंतर पुन्हा भारतीय बाजारावर विश्वास दाखवला आहे, परंतु आतापर्यंत त्याचा फारसा फायदा दिसून येत नाही. एप्रिलमध्ये आतापर्यंत FII ने देशांतर्गत बाजारात 7,707 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. असे असूनही, महिन्याच्या सुरुवातीला काही दिवसांच्या वाढीमुळे, दोन्ही एक्सचेंजेसवर विक्रीचे वर्चस्व आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात