जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock: 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, दोन वर्षात एक लाख बनले 18.25 लाख

Multibagger Stock: 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, दोन वर्षात एक लाख बनले 18.25 लाख

Multibagger Stock: 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, दोन वर्षात एक लाख बनले 18.25 लाख

FY22 मध्ये 190 पेक्षा जास्त मल्टीबॅगर स्टॉक्स दिसले आहेत. यापैकी 90 शेअरर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. बोरोसिल शेअर (Borosil Share Price) देखील त्यापैकी एक आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल : अनेक पेनी स्टॉक्सने (Penny Stock) 2021 मध्ये गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना 1725 टक्के परतावा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात 23 मार्च 2020 रोजी या स्टॉकने बाजारात नीचांकी पातळी गाठली. स्टॉकच्या खालच्या पातळीपासून आतापर्यंत या स्टॉकने गुंतवणूकदारांना (Investors) बंपर परतावा दिला आहे. गुंतवणूकदार 2 वर्षात मालामाल FY22 मध्ये 190 पेक्षा जास्त मल्टीबॅगर स्टॉक्स दिसले आहेत. यापैकी 90 शेअरर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. बोरोसिल शेअर (Borosil Share Price) देखील त्यापैकी एक आहेत. कंपनीने गेल्या 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात किती पटीने वाढ केली आहे याबद्दल माहिती घेऊयात. जर तुम्ही 2 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमचे एक लाख किती लाख झाले असते? Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील किमती 1725 टक्के परतावा दिला गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 557.50 रुपयांवरून 654 च्या पातळीवर गेला आहे. या काळात या शेअरमध्ये 16 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर आपण गेल्या 6 महिन्यांबद्दल बोललो, तर या स्टॉकची किंमत 330 रुपयांवरून 654 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय गेल्या एक वर्षातील आकडेवारी पाहिली तर हा स्टॉक 245 रुपयांवरून 654 च्या पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत, स्टॉकमध्ये सुमारे 165 टक्के वाढ झाली आहे. 8 एप्रिल रोजी ट्रेडिंग केल्यानंतर कंपनीचे शेअर्स 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 654.50 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 192 टक्के परतावा दिला आहे. बोरोसिलचे शेअर्स सुमारे 35.70 रुपयांवरून 650 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी 1725 टक्के परतावा दिला आहे. Personal Loan की Gold Loan तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर? दोघांमधील फरक समजून घ्या  1 लाख बनले 18.25 लाख जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख 1.16 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी बोरोसिल शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज जवळपास 2 लाख झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि आजपर्यंत त्यात गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 2.65 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज 18.25 लाख झाले असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात