मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील किमती

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील किमती

Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली केली आहे.

Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली केली आहे.

Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली केली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 11 एप्रिल : पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढत असल्याने नागरिकांना रोज ते तपासावे लागतात. सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) जारी केले आहेत. त्यानुसार सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली केली आहे.

मुंबईत पेट्रोल (Mumbai Petrol Price) 120.51 रुपये आहे. तर दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आहे. यापूर्वी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेल्यानंतर तेल कंपन्यांनी आपला तोटा भरुन काढण्यासाठी किमती वाढवल्या होत्या. 16 दिवसांत 14 वेळा किमती वाढवल्या (Petrol Diesel Price Hike) आहेत.

Personal Loan की Gold Loan तुमच्यासाठी कोणतं फायदेशीर? दोघांमधील फरक समजून घ्या

चार महानगरात पेट्रोल-डिझेलचे दर -

>> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर

>> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर

>> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Tax On Crypto: क्रिप्टोकरन्सी कराबाबत गुंतवणूकदारांना पडलेल्या प्रश्नांची मिळणार उत्तरं, सरकार FAQ द्वारे देणार मोठी अपडेट

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

First published:

Tags: Petrol and diesel price, Petrol price hike