मुंबई, 21 ऑक्टोबर : शेअर बाजारात IPO म्हटलं की कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची संधी गुंतवणूकदारांना (Share Market Investors) असते. त्यामुळेच गुंतवणूकदार नव्या IPO वाट पाहत असतात, जेणेकरुन नव्या कंपनीत पैसे गुंतवण्याची संधी मिळते. सध्या ऑनलाईन फर्निचरची (Online Furniture) विक्री करणारी पेपरफ्राय (Pepperfry) ही कंपनी आपला IPO पुढच्या वर्षी आणण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मार्केट रेग्य़ुलेटरने IPO साठी अर्ज करण्याची योजना आखत आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस 10 कोटी डॉलरपर्यंत प्री IPO फंडिंग राऊंड पूर्ण करणे अपेक्षित आहे. Pepperfry कंपनी नफ्यात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तोटा कमी करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. तुमच्याकडेही आहेत PPF ची एकापेक्षा अधिक खाती? या सोप्या पद्धतीनं करा विलीन Pepperfry देखील पब्लिक ऑफर करण्यापूर्वी आपली ऑफलाईन उपस्थिती वाढवत आहे. महानगर आणि छोट्या शहरांमध्ये स्टोअर उघडण्याची त्यांची योजना आहे. तसेच हे स्टोअर केवळ उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असतील आणि विकली जाणार नाहीत. ऑनलाईन फर्निचर मार्केटमध्ये जास्त कंपन्या नसल्याने सध्या फारशी स्पर्धा नाही. काही किरकोळ फर्निचर विक्रेत्यांव्यतिरिक्त, ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये (E-Commerce Companies) अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या कंपन्या फर्निचरची विक्री करतात. रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑनलाईन फर्निचर कंपनी अर्बन लेडर विकत घेतल्यानंतर या बाजारात काही कन्सॉलिडेशन झाले आहे. Gold Price Today: सोन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, 60000 रुपयांवर पोहोचणार भाव! Papperfry कंपनीने म्हटलं की, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनी नफा कमावण्याच्या जवळ होता. मात्र कंपनीने त्याऐवजी व्यवसाय वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. आता कंपनी वाढीला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला Pepperfry ला Innoven Capital कडून 35 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. फर्निचरच्या ऑनलाईन मार्केटमध्ये 80-85 टक्क्यांच्या CAGR वर वाढ होत आहे. मेट्रो आणि टियर 1 शहरांचा यात जास्त वाटा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.