मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RIL Q2 Result: 100 GW सौरऊर्जेसाठी Reliance ची जगातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी

RIL Q2 Result: 100 GW सौरऊर्जेसाठी Reliance ची जगातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी

रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सध्या सौर ऊर्जेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 2030 पर्यंत भारतात 100 GW सौर ऊर्जा स्थापित करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सध्या सौर ऊर्जेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 2030 पर्यंत भारतात 100 GW सौर ऊर्जा स्थापित करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सध्या सौर ऊर्जेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 2030 पर्यंत भारतात 100 GW सौर ऊर्जा स्थापित करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 22 ऑक्टोबर: रिलायन्स इंडिया लिमिटेडच्या (Reliance India Ltd declares Quarter 2 results) चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आहेत. जुलै ते सप्टेंबर 2021 या तीन महिन्यांत (Tremendous growth in Reliance India performance) कंपनीच्या कामगिरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सध्या सौर ऊर्जेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 2030 पर्यंत भारतात 100 GW सौर ऊर्जा स्थापित करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. यासाठी अलीकडेच रिलायन्स न्यू एनर्जी सोलर (RNESL) ने जर्मनीच्या NexWafe सोबत भागीदारी केली आहे. NexWafe मोनोक्रिस्टलाइन सिलिकॉन वेफर्स विकसित आणि उत्पादन करणारी कंपनी आहे. त्याचप्रमाणे, रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने स्टर्लिंग अँड विल्सन सोलरमध्ये 40 टक्के भागीदारी घेण्याचा निर्णय घेतला.

वाचा-दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं! कसं? वाचा सविस्तर

चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी म्हणाले की, हे कळवताना आनंद होत आहे की, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत रिलायन्सने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, आमची ऑपरेशनल आणि आर्थिक कामगिरी, रिटेल सेगमेंटमध्ये वेगाने झालेली रिकव्हरी व ऑइल-टू-केमिकल्स (O2C) आणि डिजिटल सेवा व्यवसायात सतत वाढ दर्शवत आहे.

2035 पर्यंत 'नेट कार्बन झिरो'चे लक्ष्य

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सचे उद्दीष्ट असे आहे की अशा ग्रीन सोल्युशन्स एकत्रितपणे तयार कराव्यात जेणेकरून पृथ्वीचे भविष्य सुरक्षित करता येईल. जगासह प्रत्येक भारतीयाला विकासात समान वाटा मिळेल याची खात्री करू, असंही ते म्हणाले. अंबानींच्या मते भारत जगातील हरित ऊर्जेचा नेता बनला आहे, त्यामुळेच सौर आणि हरित ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये आम्ही गुंतवणूक केली आहे. 2035 पर्यंत 'नेट कार्बन झिरो'चे लक्ष्य पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी दाखवला आहे.

वाचा-RILचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर, 46 टक्के वाढीसह तब्बल 15,479 कोटींचा नफा

40 लाख कॅम्पस जिओ फायबरशी जोडलेले आहेत

Jio Fiber दर महिन्याला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. JioFiber शी आतापर्यंत 40 लाखांहून अधिक कॅम्पस जोडले गेले आहेत. रिलायन्स जिओचे ऑप्टिकल-फायबर नेटवर्क आता जवळपास 1 कोटी 60 लाख कॅम्पसच्या बाहेर आहे.

First published:

Tags: Reliance, Reliance group, Reliance Industries Limited, Reliance Jio