मराठी बातम्या /बातम्या /मनी /अवघ्या 12 दिवसात या मल्टीबॅगर Penny Stock ने गुंतवणूकदारांचे पैसे केले डबल, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

अवघ्या 12 दिवसात या मल्टीबॅगर Penny Stock ने गुंतवणूकदारांचे पैसे केले डबल, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी (Multibagger penny stocks) गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Good Return in Share Market) दिला आहे.

आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी (Multibagger penny stocks) गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Good Return in Share Market) दिला आहे.

आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी (Multibagger penny stocks) गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Good Return in Share Market) दिला आहे.

मुंबई, 14 जानेवारी: आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी (Multibagger penny stocks) गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Good Return in Share Market) दिला आहे. असे काही स्टॉक्स देखील आहेत ज्यांनी काही आठवड्यांमध्ये त्यांच्या शेअरहोल्डर्सना श्रीमंत केले आहे. Pilita चा शेअर याचे खूप चांगले (Pilita Share Price) उदाहरण आहे. या पेनी स्टॉकने केवळ 12 ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरधारकांचे पैसे दुप्पट केले आहेत.

Pilita च्या शेअरच्या किमतीच्या इतिहासावर (Pilita Share Price History) नजर टाकल्यास, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या पेनी स्टॉकवर विक्रीचा दबाव होता. त्यावेळी या शेअरची किंमत 5.90 रुपयांवर होती, ही किंमत 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होती.

12 दिवसांत पैसे दुप्पट झाले

27 डिसेंबर 2021 रोजी हा स्टॉक 7.45 रुपयांवर  बंद झाला होता, तर 12 जानेवारी 2022 रोजी हा शेअर शेअर NSE वर 16 रुपयांवर बंद झाला होता. या स्टॉकने केवळ 12 ट्रेडिंग सत्रांमध्ये 115 टक्के परतावा दिला आहे.

हे वाचा-Edible oil Price: सामान्यांना काहीसा दिलासा! खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठी घट

काय आहे तज्ज्ञांचं मत

Pilita च्या शेअरने 10.40 रुपयांवर नवीन ब्रेकआउट दिल्यानंतर यात जोरदार तेजी आली आहे. आगामी ट्रेडिंग सत्रात या शेअरमध्ये नफा-वसुली दिसू शकते. अल्पावधीत हा शेअर 19-20 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो.

या शेअरने एका वर्षात दिला 7000% चा रिटर्न

सिमप्लेक्स पेपर्स (Simplex Papers) असं या शेअरचं नाव आहे. या शेअरची किंमत गेल्या वर्षी अवघा एक रुपया होती, ती आता वाढून 71.30 रुपये (Simplex Papers share price) झाली आहे. गेल्या वर्षी अवघ्या एक रुपयांचा असलेला हा शेअर, सहा महिन्यांमध्येच 4.41 रुपयांवर पोहोचला होता. या शेअरने वर्षभरातच गुंतवणुकदारांना तब्बल सात हजार टक्के (Penny stock gave 7000% return) रिटर्न दिला.

First published:
top videos

    Tags: Money, Share market