Home /News /money /

Edible oil Price: सामान्यांना काहीसा दिलासा! खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठी घट

Edible oil Price: सामान्यांना काहीसा दिलासा! खाद्यतेलांच्या किमतींमध्ये मोठी घट

खाद्यतेल (Edible Oil Price) हा दररोज लागणारा जिन्नस आहे. त्याच्या वापराशिवाय दररोजचा स्वयंपाक करणं अशक्य आहे. मागील काही काळापासून खाद्यतेलांच्या किमतीत सातत्यानं वाढ सुरू होती. मात्र सामान्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे

नवी दिल्ली, 14 जानेवारी: खाद्यतेल (Edible Oil Price) हा दररोज लागणारा जिन्नस आहे. त्याच्या वापराशिवाय दररोजचा स्वयंपाक करणं अशक्य आहे. मागील काही काळापासून खाद्यतेलांच्या किमतीत सातत्यानं वाढ सुरू होती. एक किलो तेलाचे दर 200 रुपये एक लीटरच्या घरात जाऊन पोहचले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. 167 व्हॅल्यू कलेक्शन सेंटर्सच्या आकडेवारीनुसार (Value Collection Centers), देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारांत खाद्यतेलांच्या किमतींमध्ये (Retail Prices Of Edible Oils) 15 ते 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे घट झाली आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत देशभरात खाद्यतेलाच्या किमती जास्तच आहेत. तरी, गेल्या वर्षीचा विचार केल्यास ऑक्टोबर 2021 पासून किमतींमध्ये काहीशी घट झाली आहे, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. ग्राहक मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, अदानी विल्मर (Adani Wilmar) आणि रुचि इंडस्ट्रीजसह (Ruchi Industries) इतर प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी तेलाच्या दरांमध्ये प्रति लीटर 15 ते 20 रुपयांची कपात केली आहे. हैदराबादमधील जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया (Gemini Edibles & Fats India Limited), दिल्लीतील मोदी नॅचरल्स, गोकुळ री-फाइन अँड सॉल्व्हंट, विजय सॉल्व्हेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस आणि एनके प्रोटीन्स या खाद्यतेल निर्मिती कंपन्यांनीही किमती कमी केल्या आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (11 जानेवारी 22) शेंगदाणा तेलाची सरासरी रिटेल किंमत 180 रुपये प्रति किलो होती. तर, मोहरी तेल 184.59 रुपये प्रति किलो, सोया तेल 148.85 रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेल 162.4 रुपये प्रति किलो आणि पामतेल 128.5 रुपये प्रति किलोनं मिळत होतं. 1 ऑक्टोबर 2021 रोजी असलेल्या किमतींच्या तुलनेत शेंगदाणा आणि मोहरी तेलाच्या रिटेल प्राईजमध्ये दीड ते तीन रुपयांनी घट झाली आहे. तर, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या किमती सात ते आठ रुपयांनी कमी झाल्या आहेत. हे वाचा-आर्थिक सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय? बजेटआधी सादर केला जातो Economic Survey आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किमती वाढलेल्या असतानाही देशात तेलाचे दर कमी करण्यात केंद्र सरकारला यश आलं आहे. राज्य सरकारांच्या भागीदारींमध्ये सक्रिय हस्तक्षेप केल्यामुळं हे शक्य झालं आहे. खाद्यतेलांच्या वाढत्या किमतींना (Edible Oil Price) लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं नोव्हेंबरमध्ये मोठा निर्णय घेतला होता. कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल आणि कच्चं सूर्यफूल तेल यावरील मूलभूत शुल्क (Basic duty) 2.5 टक्क्यांवरून शून्यावर आणलं होतं. यामुळे खाद्यतेलांच्या किमती कमी होण्यास मदत झाली आहे. जागतिक उत्पादनात आलेली घट आणि निर्यातदार देशांकडून निर्यात कर व लेव्ही (Export Tax/Levy) वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) खाद्यतेलांच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. खाद्यतेलांच्या देशांतर्गत किमती या पूर्णपणे आयात तेलाच्या किमतींवर ठरतात. म्हणून गेल्या वर्षभरात तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारनं त्या काहीशा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असं ग्राहक मंत्रालयानं सांगितलं आहे. हे वाचा-Gold-Silver Prices:सोन्याच्या किमतीत पुन्हा तेजी, सोनंखरेदीआधी तपासा लेटेस्ट भाव देशातील खाद्यतेलाच्या गरजेचा विचार केल्यास जगातील सर्वात मोठ्या आयातदारांमध्ये (Importer) भारताचा समावेश होतो. कारण देशांतर्गत उत्पादन देशातील एकूण मागणी पूर्ण करू शकत नाही. देशातील खाद्यतेलांच्या एकूण वापरापैकी सुमारे 56 ते 60 टक्के तेल हे आयात केलेलं असतं. ही स्थिती पाहता देशातील खाद्यतेल निर्मितीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. सध्या खाद्यतेलामध्ये 15 ते 20 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे देशातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
First published:

पुढील बातम्या