मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market : शेअर बाजाराला रशिया-युक्रेन युद्धाची झळ, गुंतवणूदारांचं 13 लाख कोटींचं नुकसान

Share Market : शेअर बाजाराला रशिया-युक्रेन युद्धाची झळ, गुंतवणूदारांचं 13 लाख कोटींचं नुकसान

शेअर बाजारात फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. BSE चे बाजार भांडवल 2 फेब्रुवारी रोजी 2,70,64,905.75 कोटी रुपये होते, जे आता 2,42,31,379.20 कोटी रुपये आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 24 फेब्रुवारी : रशियाने युक्रेनवर (Russia-Ukraine Crises) केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या दोन देशांमधील संघर्षामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात (Share Market) भूकंप झाला. भारतीय शेअर बाजार सलग सातव्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरणीसह बंद झाला आहे. केवळ आजच्या घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारच्या व्यापारात BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 242.28 लाख कोटी रुपये होते. एक दिवस आधी ही रक्कम 255.68 लाख कोटी रुपये होती. या संदर्भात, केवळ एका दिवसाच्या व्यवसायात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Russia-Ukraine Crises: शेअर बाजारात घसरणीदरम्यान खरेदीचा विचार करताय? तज्ज्ञांच्या मते अशी रणनिती ठरवा

फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28.33 लाख कोटींचे नुकसान

फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. BSE चे बाजार भांडवल 2 फेब्रुवारी रोजी 2,70,64,905.75 कोटी रुपये होते, जे आता 2,42,31,379.20 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरला, निफ्टी 16250 च्या खाली बंद 

बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 2702.15 अंकांनी किंवा 4.72 टक्क्यांच्या घसरणीसह 54529.91 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 815.30 अंकांच्या किंवा 4.78 अंकांच्या घसरणीसह 16248 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील सर्व इंडेक्ट आज लाल निशाणात बंद झाले. तर Tata Motors, IndusInd Bank, UPL, Grasim Industries आणि Adani Ports या शेअर्सची सर्वाधिक नुकसान झालं. निफ्टी बँकमध्ये 5.79 टक्क्यांची, निफ्टी आयटीमध्ये 4.59 टक्क्यांची, स्मॉलकॅपमध्ये 5.77 टक्क्यांची घसरण झाली.

Gold Price : Russia-Ukraine युद्धामुळे सोन्याची चमक वाढणार, 60000 रुपयांच्या पुढे जाणार सोनं

बाजारातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेवेळी म्हणजेच 23 मार्च 2020 नंतर बाजारातील पॉइंट्सच्या दृष्टीने ही सर्वात मोठी घसरण आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊनच्या भीतीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील पॉइंट्सच्या दृष्टीने सर्वात मोठी घसरण आहे

First published:

Tags: Investment, Money, Share market