मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price : Russia-Ukraine युद्धामुळे सोन्याची चमक वाढणार, 60000 रुपयांच्या पुढे जाणार सोनं?

Gold Price : Russia-Ukraine युद्धामुळे सोन्याची चमक वाढणार, 60000 रुपयांच्या पुढे जाणार सोनं?

भू-राजकीय जोखमीमुळे एमसीएक्सवर सोने 2.15 टक्क्यांनी वाढून 51750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आजच्या व्यवहारात सोन्यामध्ये सुमारे 1300 रुपयांची वाढ झाली आहे.

भू-राजकीय जोखमीमुळे एमसीएक्सवर सोने 2.15 टक्क्यांनी वाढून 51750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आजच्या व्यवहारात सोन्यामध्ये सुमारे 1300 रुपयांची वाढ झाली आहे.

भू-राजकीय जोखमीमुळे एमसीएक्सवर सोने 2.15 टक्क्यांनी वाढून 51750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आजच्या व्यवहारात सोन्यामध्ये सुमारे 1300 रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबई, 24 फेब्रुवारी : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे (Russia-Ukraine Crises). रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीला (Gold Price) आधार मिळू शकतो.

केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्यामध्ये त्यांचे आकर्षण वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने या वर्षाच्या अखेरीस 58000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे पोहोचू शकते. परिस्थिती आणखी बिघडल्यास सोन्याच्या किमती 60,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.

Cryptocurrency Prices Today: रशिया आणि युक्रेन संघर्षादरम्यान क्रिप्टोकरन्सी धडाम

पुढील महिन्यात 53,500 चा टप्पा गाठू शकतो

अजय केडिया म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. जगभरातील शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता आणि अन्य कारणे पाहता ते सोन्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याचा अंदाज खूपच मजबूत दिसत आहे. अशा परिस्थितीत 31 मार्च 2022 पर्यंत देशांतर्गत बाजारात सोने 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आकडा गाठू शकते.

Bloodbath in Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड, Sensex 1814 अंकांनी घसरला तर Nifty 500 अंकांनी खाली

MCX वर सोने 51,750 वर पोहोचले

भू-राजकीय जोखमीमुळे एमसीएक्सवर सोने 2.15 टक्क्यांनी वाढून 51750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आजच्या व्यवहारात सोन्यामध्ये सुमारे 1300 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव 1950 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. सुरक्षित गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार इक्विटीमधून बाहेर पडत आहेत आणि सोने खरेदी करत आहेत.

या 6 कारणांमुळे आउटलुक मजबूत दिसत आहे

>> अजय केडिया म्हणतात की, रशिया-युक्रेन संघर्षात अमेरिका, युरोपियन देश आणि नाटोकडून अपडेट येणे बाकी आहे.

>> अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदर वाढवणार आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता तो व्याजदर वाढीचा निर्णय पुढे ढकलू शकतो.

>> महागाई सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे, ब्रिटनलाही त्याचा फटका बसत आहे.

>> डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे.

>> आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे पोहोचल्या आहेत.

>> रशिया आणि युक्रेनसारख्या भू-राजकीय तणावानंतर जगभरात महागाई वाढली आहे.

>> सद्यस्थिती पाहून थक्क झालेल्या गुंतवणूकदारांच्या नजरा आता गुंतवणुकीसाठी सोन्यावर असतील.

First published:

Tags: Gold, Gold prices today