मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Russia-Ukraine Crises: शेअर बाजारात घसरणीदरम्यान खरेदीचा विचार करताय? तज्ज्ञांच्या मते अशी रणनिती ठरवा

Russia-Ukraine Crises: शेअर बाजारात घसरणीदरम्यान खरेदीचा विचार करताय? तज्ज्ञांच्या मते अशी रणनिती ठरवा

चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी असल्याचे या बाजार तज्ज्ञांचे मत आहे. बहुतेक तज्ञ माहिती तंत्रज्ञान (IT) चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी असल्याचे या बाजार तज्ज्ञांचे मत आहे. बहुतेक तज्ञ माहिती तंत्रज्ञान (IT) चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी असल्याचे या बाजार तज्ज्ञांचे मत आहे. बहुतेक तज्ञ माहिती तंत्रज्ञान (IT) चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 24 फेब्रुवारी : रशिया आणि युक्रेन यांच्यात (Russia-Ukraine Crises) युद्ध सुरू झालं आहे. आज युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले झाले. अशा स्थितीत शेअर बाजारातही घसरण होत आहे. गुरुवारी, NSE निफ्टी (Nifty 50) मध्ये सुमारे 500 अंकांची घसरण झाली आहे आणि सेन्सेक्स (BSE Sensex) 1600 हून अधिक अंकांनी घसरला आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या गुंतवणूकदारांनी बाजारातून आपले पैसे काढून घेतले असले, तरी काही गुंतवणूकदार अशाच संधी शोधत असतात. हीच वेळ आहे जेव्हा स्मार्ट गुंतवणूकदार स्वस्त किमतीत स्टॉक घेतात आणि नंतर नफा कमावतात. या घसरणीच्या काळात तुम्हालाही शेअर्स खरेदी करायचे असतील, तर तुम्ही तज्ज्ञांच्या मतानुसार शेअर्स खरेदी करू शकता.

आज आम्ही तुमच्यासोबत काही तज्ञांचे मत शेअर करत आहोत. ही वेळ चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी असल्याचे या बाजार तज्ज्ञांचे मत आहे. बहुतेक तज्ञ माहिती तंत्रज्ञान (IT) चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

करेक्शन होणार होतं

अशा घसरत्या बाजारपेठेतील गुंतवणूकदारांसाठी पॉलिसी स्पष्ट करताना, ट्रेडिंगोचे संस्थापक पार्थ न्याती म्हणाले, 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, आम्ही बाजारात प्रथमच करेक्शन पाहत आहोत. हे करेक्शन येणार होतं आणि भू-राजकीय तणाव (Russia-Ukraine) हे एक कारण बनले. महागाई आणि वाढलेले व्याजदर हे प्रमुख चिंतेचे विषय आहेत. ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे इक्विटी मार्केट आणि भू-राजकीय तणावासाठी महागाईचा धोका वाढतो. खरंतर, अशा भौगोलिक-राजकीय समस्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी देतात. आम्ही स्ट्रक्चरल बुल रनमध्ये आहोत, जी पुढील काही वर्षे चालू राहण्याची शक्यता आहे. या काळात काही करेक्शन या प्रवासाचा एक भाग असतील.

Gold Price : Russia-Ukraine युद्धामुळे सोन्याची चमक वाढणार, 60000 रुपयांच्या पुढे जाणार सोनं

या क्षेत्रात गुंतवणुकीची संधी

पार्थ न्याती म्हणाले की, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये आणि खालच्या स्तरावरून खरेदीच्या संधी शोधू नये. त्यांनी अशा क्षेत्रांकडे लक्ष दिले पाहिजे, जे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरतील, जसे की कॅपिटल गुड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि फायनान्शियल सेक्टर्स.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक स्ट्रॅटजिस्ट व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, गुंतवणूकदारांनी कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी प्रतीक्षा करावी आणि पुढील परिस्थिती पाहावी. खरेदी केवळ त्या स्टॉक्स आणि सेगमेंट्सपुरती मर्यादित असली पाहिजे ज्यांची वॅल्यू योग्य असेल किंवा ते चांगले कमाई करणारे आहेत.

Cryptocurrency Prices Today: रशिया आणि युक्रेन संघर्षादरम्यान क्रिप्टोकरन्सी धडाम

आयटी शेअर्समध्ये चांगली पोझिशन निर्माण केली पाहिजे

या कमकुवत स्थितीत गुंतवणूकदारांना आयटी स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला देताना व्हीके विजयकुमार म्हणाले की, आयटी हे हाय वॅल्युएशन असले तरी हे असे क्षेत्र आहे ज्याच्या शक्यता सतत सुधारत आहेत. असे दिसून आले आहे की अनेक प्रमोटर्स आयटी कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करत आहेत. हे या क्षेत्रातून अपेक्षित निकालापेक्षा चांगले असल्याचे लक्षण आहे. गुंतवणूकदार हळूहळू IT मध्ये दर्जेदार स्टॉक खरेदी करू शकतात.

सौरभ जैन, उपाध्यक्ष (संशोधन), एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज यांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या घसरत्या बाजारात एव्हर ग्रीन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. "बँका, रिअल इस्टेट आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रांव्यतिरिक्त या कमकुवत बाजारपेठेत रिलायन्स आणि भारती एअरटेलसारखे दर्जेदार स्टॉक खरेदी केले जाऊ शकतात.

First published:

Tags: Money, Share market