• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून बदणार Demat खात्यासंदर्भातील नियम

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून बदणार Demat खात्यासंदर्भातील नियम

आता या डिमॅट खात्यासंदर्भात काही नवीन नियम (New Rules) लागू करण्यात आले असून, येत्या एक ऑक्टोबरपासून हे नियम लागू होणार आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 24 जुलै: शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांना डिमॅट खातं (Demat Account) असणं आवश्यक असतं. त्याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करता येत नाही. आता या डिमॅट खात्यासंदर्भात काही नवीन नियम (New Rules) लागू करण्यात आले असून, येत्या एक ऑक्टोबरपासून हे नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमानुसार, आता नवीन डिमॅट खातं उघडताना नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशन अर्ज (Nomination Form) भरणं बंधनकारक असेल. तुम्हाला तुमच्या डिमॅट खात्यासाठी कोणालाही नॉमिनी करायचे नसेल तर तो पर्यायही उपलब्ध आहे; मात्र त्याकरता एक वेगळा अर्ज भरणं अनिवार्य आहे. आधीपासूनच डिमॅट खातं असणाऱ्या गुंतवणूकदारांना 31 मार्च 2022 पर्यंत या नियमाची पूर्तता करणं आवश्यक आहे. नॉमिनेशनची प्रक्रिया अगदी सोपी आहे. डिमॅट खातं उघडतानाच तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नॉमिनेशन करू शकता. त्या वेळी हे काम केलेलं नसेल, तर नंतरही एक अर्ज भरून हे करता येतं. खातं उघडतानाच नॉमिनेशन करणं सोयीचं ठरतं. आपल्या कोणत्याही खात्यासाठी नॉमिनी (Nominee) नेमणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण अकाली मृत्यू झाल्यास, तुमच्या पैशाचा विश्वस्त म्हणून त्या व्यक्तीला ग्राह्य धरलं जातं. यामुळं आर्थिक व्यवहार करणं सोपं जातं. तुम्ही कोणाचंही नाव दिलं नसेल तर तुमचे पैसे तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना मिळण्यास अडचणी येऊ शकतात. हे वाचा-झोमॅटोचे Deepinder Goyal आता 1 लाख कोटी मूल्याच्या कंपनीचे CEO; कसा होता प्रवास? डिमॅट खात्यासाठी किमान एक किंवा जास्तीत जास्त तीन जणांना नॉमिनी करता येतं; मात्र त्याच वेळी कोणत्या नॉमिनीला किती टक्के रक्कम द्यायची हे स्पष्टपणे नमूद करावं लागतं. तसंच आपण एका व्यक्तीचं नॉमिनेशन केलं असेल आणि नंतर ते बदलू इच्छित असाल तर तेही शक्य आहे. ही प्रक्रियादेखील अत्यंत सोपी आहे. याकरिता तुम्हाला एक नवीन नॉमिनेशन अर्ज भरावा लागेल आणि तुम्हाला ज्या दुसऱ्या व्यक्तीला नॉमिनी करायचं आहे, त्या व्यक्तीची सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर तुमच्या खात्यासाठी आधी नोंदवलेल्या नॉमिनीचं नाव काढून टाकून नवीन नॉमिनीचं नाव नोंदवलं जाईल. हे वाचा-बिझनेस सुरू करायचाय? पोहे करतील काम; 25 हजार गुंतवलेत तरी दीड लाख कमाई बँक खात्यासाठी किंवा पीपीएफ, आयुर्विमा अशा ठिकाणी नॉमिनेशन असणं अनिवार्य असतं. आता डिमॅट खात्यासाठीही हा नियम कठोरपणे राबवण्यात येणार आहे. सध्याच्या काळात शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत असून, शेअर्समधील उलाढाल प्रचंड असते. त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात. याकरिता नॉमिनेशन असणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
First published: