मराठी बातम्या /बातम्या /मनी /

झोमॅटोचे Deepinder Goyal आता 1 लाख कोटी मूल्याच्या कंपनीचे CEO; कसा होता इथपर्यंतचा प्रवास?

झोमॅटोचे Deepinder Goyal आता 1 लाख कोटी मूल्याच्या कंपनीचे CEO; कसा होता इथपर्यंतचा प्रवास?

दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) आणि पंकज चढ्ढा (Pankaj Chhaddah) यांनी 2008मध्ये रेस्तराँ आणि फूड लिस्टिंग वेबसाइट म्हणून फूडीबे (Foodiebay) या नावाने या कंपनीची सुरुवात केली होती.

दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) आणि पंकज चढ्ढा (Pankaj Chhaddah) यांनी 2008मध्ये रेस्तराँ आणि फूड लिस्टिंग वेबसाइट म्हणून फूडीबे (Foodiebay) या नावाने या कंपनीची सुरुवात केली होती.

दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) आणि पंकज चढ्ढा (Pankaj Chhaddah) यांनी 2008मध्ये रेस्तराँ आणि फूड लिस्टिंग वेबसाइट म्हणून फूडीबे (Foodiebay) या नावाने या कंपनीची सुरुवात केली होती.

देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हॉटेल्स, रेस्तराँमधले पदार्थ घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करणारी झोमॅटो (Zomato) कंपनी गेल्या काही दिवसांत खूप चर्चेत आहे ती तिच्या (IPO) आयपीओमुळे. 23 जुलैला या कंपनीने शेअर बाजारात दिमाखात प्रवेश केला. आता या कंपनीचा अधिकृतरीत्या 'टॉप 100 लिस्टेड कंपनीज'मध्ये समावेश झाला. कारण या कंपनीचं बाजार भांडवली मूल्य (Market Capital Value) आता एक लाख कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. अलीकडच्या काळातल्या सर्वांत मोठ्या आयपीओपैकी हा एक आयपीओ होता. इंटरनेटवर आधारित असलेली आणि शेअर बाजारात लिस्ट होणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) आणि पंकज चढ्ढा (Pankaj Chhaddah) यांनी 2008मध्ये रेस्तराँ आणि फूड लिस्टिंग वेबसाइट म्हणून फूडीबे (Foodiebay) या नावाने या कंपनीची सुरुवात केली होती. हे दोघेही आयआयटी-दिल्लीतून शिकलेले असून, ब्रेन कन्सल्टिंग नावाच्या एका फर्ममध्ये काम करत असताना दोघांची ओळख झाली.

एक छोटी कल्पना घेऊन सुरू झालेली ही कंपनी 2011पर्यंत चर्चेत आली. कारण रेस्तराँ रेकमंडेशन, बुकिंग, रेटिंग, रिव्ह्यूज आदी सगळ्यांसाठीच फूडीबे हे 'वन स्टॉप शॉप' ठरलं. या कंपनीने पहिल्यांदा 60 लाख रुपयांचा निधी उभारला तो इन्फो एजकडून. त्यातून या कंपनीच्या पायाभूत सुविधांची उभारणी झाली.

शुक्रवारी (23 जुलै) झोमॅटो कंपनीची राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजारात (BSE) नोंदणी झाली. BSEमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 115 रुपये असून, NSEमध्ये ती 116 रुपये आहे. ही किंमत इश्यू प्राइसच्या अनुक्रमे 51.32 टक्के आणि 52.63 टक्के एवढी जास्त आहे.

हे ही वाचा-नोकरी करुन कंटाळा आलाय? मग हा व्यवसाय करा आणि दिवसाला कमवा 4 हजार रुपये

झोमॅटो कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी कंपनीच्या शेअरधारकांना पत्र लिहिलं असून, त्यांचे आभार मानले आहेत. तसंच, ओला, उबेर, फ्लिपकार्ट, पेटीएम आणि अॅमेझॉन यांसारख्या अन्य स्टार्टअप कंपन्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. या सगळ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भारतात घातलेल्या पायामुळे तयार झालेल्या इंटरनेट स्पेसचा योग्य वापर झोमॅटोला करता आला, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

एक काळ असा होता, की झोमॅटो कंपनी आपल्या वेबसाइटवरच्या केवळ जाहिरातींतून पैसे कमवत होती. नोव्हेंबर 2013पर्यंत ते तसंच सुरू होते. तेव्हा सेक्विया कॅपिटल इंडियाने सुमारे 37 दशलक्ष डॉलरचं फंडिंग या कंपनीला केलं. तेव्हा इन्फो एज आणि सेक्विया या दोन्ही गुंतवणूकदारांनी कंपनीचं मूल्य 150 दशलक्ष डॉलर्स एवढं असल्याचं पाहिलं. अजिबात चर्चेत नसलेली कंपनी एकदम आघाडीवर येईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.

गोयल आणि चढ्ढा यांनी दशकभरापूर्वी आपला प्रवास सुरू केला. गोयल यांना प्रकाशझोतात राहण्याची फारशी आवड नव्हती आणि त्यापेक्षा त्यांना काम करण्यात आणि नवी उंची गाठण्यात रस होता. त्यांच्या विजिगीषू वृत्तीमुळे त्यांची कंपनी आज हा दिवस पाहू शकली.

कोविड-19मुळे (Covid Pandemic) कंपनीला अनपेक्षित आणि मोठा फटका बसला. 2020मध्ये कंपनीला 2363 कोटी रुपयांचा तोटा झाला. 2021मध्ये तो तोटा 812 कोटींवर आला आहे. आता ही पब्लिक लिस्टेड कंपनी झाली आहे. संस्थापकांनी सुरुवातीला ज्याची कदाचित कल्पनाही केली नसेल, एवढा हा लांबचा टप्पा आहे.

झोमॅटो अॅपवर लवकरच ग्रोसरी सर्व्हिसही सुरू होणार आहे. कंपनीने ग्रोफर्समध्ये 100 दशलक्ष डॉलर्स गुंतवले आहेत. कोरोना महामारीच्या काळात ही सेवा सुरू करण्यात आली होती; मात्र विचित्र परिस्थितीमुळे ती तेव्हा बंद करावी लागली. आता कंपनीचा शेअर बाजारात ऐतिहासिक प्रवेश झाल्यामुळे हे फीचर कंपनी पुन्हा एकदा सुरू करणार आहे. आणखी काय काय ही कंपनी घेऊन येणार आहे, हे येणारा काळच सांगेल.

First published:

Tags: Food, Share market, Zomato