मुंबई, 27 फेब्रुवारी : रशिया-युक्रेन संकटामुळे (Russsia-Ukraine Crises) जगभरातील शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात (Share Market) सुमारे 3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजारात रिकव्हरी पाहायला मिळाली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी वॅल्यू स्टॉक्समध्ये खरेदी केली. गेल्या आठवड्यात निफ्टी (Nifty) 3.6 टक्क्यांनी आणि सेन्सेक्स (Sensex) 3.4 टक्क्यांनी घसरला. ब्रॉडर मार्केटमध्येही मोठी घसरण झाली. मिडकॅप इंडेक्स 3.4 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 5.3 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर पार भू-राजकीय तणावाचा परिणाम वस्तूंच्या किमतीवरही दिसून आला. कच्च्या तेलाने गेल्या 8 वर्षांचा विक्रम मोडीत काढत 100 डॉलरच्या पुढे गेला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पुढील आठवड्यात भू-राजकीय तणाव केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाजार अस्थिर राहील. याशिवाय यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या काँग्रेसमधील विधानावरही बाजाराची नजर असेल. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे तर, बाजाराची नजर पुढील आठवड्यात येणार्या जीडीपी डेटा, पायाभूत सुविधा आऊटपुट डेटावर असेल. BOB, SBI आणि HDFC ग्राहकांसाठी खूशखबर! या बदलाचा होणार मोठा फायदा निफ्टीला 16500 वर इमिडिएट सपोर्ट एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Securities) नागराज शेट्टी सांगतात की शुक्रवारी बाजारात दिसून आलेला पुलबॅक हे चांगले लक्षण आहे, परंतु निफ्टीला 16700-16800 च्या पुढे जाण्यासाठी मोठा अडथळा आहे. जर निफ्टी या पातळीच्या वर राहिला तरच अल्पावधीत आणखी वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे, निफ्टीला 16500 वर तात्काळ सपोर्ट आहे, जर हा सपोर्ट तुटला तर आणखी घसरण होऊ शकते. Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात वाढ; संपूर्ण आठवड्यात किती दर वाढले? India VIX अजूनही 25 च्या वर स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना सांगतात की, शेवटचा आठवडा बाजारासाठी खूप वाईट होता आणि निफ्टी 200-डीएमएच्या खाली सरकताना दिसला. बाजारातील परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. India VIX अजूनही 25 च्या वर आहे. अशा स्थितीत पुढील आठवड्यात बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीवर बोलताना ते म्हणाले की गेल्या आठवड्यात 200-DMA चा सपोर्ट देखील मोडला. आता यासाठी तात्काळ सपोर्ट 35000 वर दिसत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर तो 34250-34000 च्या पातळीवर जाताना दिसतो. वरच्या बाजूस, त्याची 200 DMA किंवा 37000 पातळी मजबूत रजिस्टन्स म्हणून पाहिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.